कुडाळ | प्रतिनिधी
ब-याच वेळा परपुरूषाबरोबर फिरताना त्याने तिला पाहिले, वारंवार तिला समजावून सुद्धा ती ऐकली नाही अखेर त्याने आपल्या पत्नीला संपवले आणि आपल्या पत्नीला संपवल्याचे त्याने आपल्या मुलीला सांगितले. ही घटना भडगाव धनगरवाडी येथील असून ओमप्रकाश बंधन सिंह याने आपल्या पत्नीला ठार मारले आणि तो पळून गेला. त्याच्या शोधासाठी कुडाळ पोलिसांनी पथक रवाना केले असून मुंबई रेल्वे पोलिसांची मदत घेतली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी दिली.
नेरूर कविलगाव येथे सिंह कुटुंब राहतात ओमप्रकाश सिंह व त्यांची पत्नी सौ रेणुका सिंह यांना तीन मुली व एक मुलगा असा त्यांचा परिवार आहे. ओमप्रकाश सिंह हा सेंट्रींगची काम घेतो आणि या कामामधून मार्च २०२४ मध्ये त्याला भडगाव येथील सेंट्रींगचे काम मिळाले. त्यामुळे काही दिवस कवीलगाव आणि काही दिवस भडगाव येथे पती-पत्नी राहत होते. दरम्यान या घटनेबाबत त्यांची मुलगी रिया ओमप्रकाश सिंह हिने कुडाळ पोलिसांना दिलेल्या माहितीमध्ये असे म्हटले आहे की, आई व वडील यांच्यामध्ये सातत्याने भांडण होत होती. वडील आईवर चारित्र्यावरून संशय घेत होते. आणि ही भांडण होत असताना हिला कधीतरी मी ठार मारून कोठडीत जाईन असे बोलत असत. १३ ऑक्टोंबर रोजी वडील ओमप्रकाश यांनी आई रेणुका हिला भडगाव येथे बोलवलं त्याच दिवशी संध्याकाळी रिया तिचे बोलणे आईसोबत झाले होते. १४ ऑक्टोंबर रोजी रिया हिने आईला भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र हा भ्रमणध्वनी बंद असल्याचे आढळून आले अखेर रिया हिने १४ ऑक्टोंबर रोजी संध्याकाळी आपल्या मैत्रिणी सोबत भडगाव धनगरवाडी येथे आई राहत असलेल्या घरी गेली. त्या ठिकाणी घराला कुलूप दिसले म्हणून ती व मैत्रीण पुन्हा कुडाळ येथे आले.
दरम्यान १५ ऑक्टोंबर रोजी रिया हिचे वडील ओमप्रकाश याने पहाटे ४:४८ वाजता भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून आपल्या पत्नीला ठार मारल्याचे सांगितले. आणि चावी चुलीमध्ये आहे. ती घेऊन दरवाजा उघडा तिचे साहित्य बाजूलाच आहे असे सांगितले. त्यानंतर रिया हिने आपल्या नातेवाईकांना फोन लावून पोलीस ठाण्याची संपर्क साधून या घटनेची माहिती दिली. पोलीस घटनास्थळी गेल्यानंतर सौ. रेणुका उर्फ रेश्मा या मयत अवस्थेत आढळून आल्या आपल्या पत्नीला ठार मारून ओमप्रकाश सिंह यांनी पळ काढली.
मयत रेणुका सिंह तिच्या मृतदेहाच्या बाजूला होती चिठ्ठी
ओमप्रकाश सिंह यांने मृतदेहाच्या बाजूला चिठ्ठी लिहून ठेवली या चिठ्ठीमध्ये असे लिहिले होते की माझ्या पत्नीने मला धोका दिलेला सहन झाला नाही तिला अनेक वेळा पर पुरुषाबरोबर फिरताना मी पाहिले तिला समजावण्याचा प्रयत्न केला पण ती मला सोडण्याचा विचार करत होती आणि हे मला मान्य नव्हते म्हणून मी तिला ठार मारले ही चिठ्ठी ओमप्रकाश सिंह यांच्या हस्ताक्षरात असल्याचे तिची मुली रिया सिंह हिने सांगितले.
पथक झाले मुंबईला रवाना
ओमप्रकाश सिंह यांने आपल्या पत्नीला ठार मारून पळ काढला दरम्यान पोलिसांनी मोबाईल लोकेशनद्वारे माहिती घेतली असता ओमप्रकाश हा मुंबई दादर येथे असल्याचे समजून आले कुडाळ पोलिसांनी पोलीस उपनिरीक्षक क-हाडकर पोलीस कर्मचारी श्री. माळगावकर, श्री. मुंडे या पथकाला मुंबई येथे रवाना केले असून रेल्वे पोलिसांची मदत घेतली आहे. आरोपी लवकरच पोलिसांच्या ताब्यात येईल असे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी सांगितले.
वीस वर्षापासून हे कुटुंब आहे सिंधुदुर्गात
ओमप्रकाश सिंह झारखंड येथील मुळ रहिवाशी आहे तर त्याची पत्नी रेणुका ही मूळची कर्नाटक राज्यातील असून त्यांनी विवाह केला त्यानंतर हे कुटुंबीय कुडाळ येथे राहत होते. गेली वीस वर्ष कुटुंब हे या ठिकाणी राहत आहे. ओमप्रकाश हा सेंट्रिंगची काम करत असे. अशी माहिती पोलीस निरीक्षक मगदूम यांनी दिली.
