पोटच्या पोराने आईचा केला खून ; कसाल बौद्धवाडी येथील घटना

0

सिंधुदुर्गनगरी | प्रतिनिधी 

कसाल बौद्धवाडी येथे राहत असलेल्या मनोरमा मोहन कदम (५८) हीचा तिचा मुलगा सुरेंद्र मोहन कदम (४०) याने गळा दाबून खून केल्याची घटना सोमवारी रात्री उघड झाली आहे. आईचा खून केल्यानंतर बॅग भरून पळून जाण्याचा प्रयत्न करत असतानाच पोलीस दाखल झाल्याने आरोपी मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलं.

बाजारात जाण्यावरून झालेल्या वादातून खून केल्याची माहिती समोर येत आहे. सुरुवातीला हाताने मारहाण केल्यावर घरातून पळून आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करत असलेल्या आईला घराबाहेर पकडून पाण्याच्या दोरीच्या सहाय्याने गळा दाबून खून केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे याबाबत ओरोस पोलीस ठाणे तपास करीत आहे.