खासदार नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मंजूर केला निधी
भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख निलेश राणे यांच्या माध्यमातून मंजूर झाला निधी
भाजपचा गटनेता विलास कुडाळकर यांची माहिती
कुडाळ | प्रतिनिधी
कुडाळ नगरपंचायतीला यावर्षी नगरोत्थान योजनेमधून सुमारे ४ कोटी एवढा निधी मंजूर झाला असून हा निधी खासदार नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मंजूर केला असून यासाठी भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख निलेश राणे यांच्या माध्यमातून निधी प्राप्त झाला आहे अशी माहिती नगरपंचायतीचे भाजपा गटनेता विलास कुडाळकर यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
गेल्या अडीच वर्षांमध्ये महायुतीचे सरकार आल्यापासून कुडाळ नगरपंचायतीला विविध माध्यमातून या सरकारने निधी दिला आहे. गेल्या वर्षी नगरपंचायतीला नगरोत्थांनमधून सुमारे ४ कोटी निधी प्राप्त झाला होता यावर्षी सुद्धा नगरपंचायतीला नरोत्थांन निधी मधून ४ कोटी एवढा निधी मंजूर झाला आहे. यामध्ये शहरातील अनेक विकास कामे होणार आहेत. यामध्ये संरक्षण भिंत, गटार, रस्ते, सुशोभीकरण अशी विविध कामे आहेत.
हा निधी माजी केंद्रीय मंत्री व खासदार नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मंजूर केला असून भाजपचे मालवणी विधानसभा प्रमुख निलेश राणे यांच्या माध्यमातून हा निधी मिळाला. हा निधी नगरपंचायतीला मिळवून दिल्याबद्दल भाजपचे गटनेते विलास कुडाळकर यांनी आभार मानले आहे.
