ओरोस | प्रतिनिधी
बाजारात जाण्यावरून आई आणि मुलांमध्ये पराकोटीचा वाद उफाळला आणि त्याचे पर्यावसान मारामारीत झाले. रागाच्या संतापाच्या भरात मुलाने आईचा गळा दाबल्याने ती जागीच गतप्राण झाली ही दुर्दैवी घटना कुडाळ तालुक्यातील कसाल बौद्धवाडी येथे सोमवारी रात्री घडली असल्याची माहिती सिंधुदुर्ग नगरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वरोटे यांनी दिली. याप्रकरणी संशयित सुरेंद्र मोहन कदम (वय ४०) याच्यावर स्वतःची आई मनोरमा मोहन कदम(वय ५८) हिच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक करण्यात आले असल्याचे सांगितले या घटनेनंतर पोलिसांना तात्काळ खबर मिळाल्यावर घटनास्थळी पोलिस दाखल झाले.
आईचा खून केल्यानंतर बॅग भरून पळून जाण्याचा प्रयत्न करत असतानाच पोलीस दाखल झाल्याने संशयीत मुलाला पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली. बाजारात जाण्यावरून झालेल्या वादातून खून केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे सुरुवातीला हाताने मारहाण केल्यावर घरातून पळून आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करत असलेल्या आईला घराबाहेर पकडून पाण्याच्या दोरीच्या सहाय्याने गळा दाबून खून केल्याची प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे याबाबत सिंधुदुर्ग नगरी पोलीस ठाणे तपास करीत आहे. सिंधुदुर्ग नगरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वरोटे यांनी दिलेल्या माहितीनुसार
याबाबतची फिर्याद सिंधुदुर्ग नगरी पोलीस ठाण्याचे पोलीस शैलेश सोनसुरकर यांनी दिली, त्यानुसार संशयीत सुरेंद्र मोहन कदम याच्यावर भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 103 (1) प्रमाणे पुन्हा दाखल करण्यात आला आहे पुण्यात वापरलेली विहिरीचे पाणी काढण्यासाठी असलेली दोरी जप्त करण्यात आली १४ ऑक्टोंबर रोजी रात्री साडेसात ते आठच्या सुमारास ही घटना कसाल बौद्धवाडी येथील आंब्याचे झाडाखाली घडली
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयीत आरोपी याने आपली आई मनोरंजना मोहन कदम, (वय- ५८ वर्ष, रा.- कसाल, बौद्धवाडी) हीस बाजारात जाण्याच्या कारणावरून घरासमोर अंगणात हाताचे थापटाने मारल्याने यातील मयत ही अंगणातील गवतात जाऊन पडली तेथेही आरोपीत याने मयताचे कानाखाली जोरात चापट मारली म्हणून यातील मयत ही त्याच्यापासून सुटका करून घेण्यासाठी रोडकडे जात असताना बाजूला असलेल्या आंब्याच्या झाडाजवळ गेली असता आरोपीने मयत हिला ढकलून आंब्याच्या झाडाजवळ पाडले त्यावेळी आरोपीने त्याच्या सोबत आणलेली घरातील विहिरीतील पाणी काढण्याची दोरीने जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने मयत मनोरंजना कदम हिचा पाठीमागून येवुन हातातील दोरीच्या साह्याने गळा आवळून जीवे ठार मारले अशी फिर्याद देण्यात आली या घटनेमुळे परिसरात एकच उडाली खळबळ उडाली आहे
