कुडाळ | प्रतिनिधी
प. पू. सद्गुरू समर्थ राऊळ महाराजांचा ११९ वा जन्मोत्सव सोहळा १६ ऑक्टोबर रोजी पिंगुळी येथील राऊळ महाराज मठात आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. १६ रोजी पहाटे ५.३० वाजता नित्य काकड आरती, सकाळी ७ वाजता समर्थ राऊळ महाराज समाधीस्थानी अभिषेक व सार्वजनिक गाऱ्हाणे, ८ वाजता धार्मिक विधी, दुपारी १२ वाजता समर्थ विनायक (अण्णा) महाराज समाधीस्थानी पादुका पूजन व आरती, १२.३० वाजता सद्गुरू राऊळ महाराज समाधीस्थानी ‘श्रीं’ची महाआरती, दुपारी १ ते रात्री १० वाजेपर्यंत महाप्रसाद, १ वाजता प. पू. राऊळ महाराज भक्त मंडळ (मुंबई) चे भजन, दुपारी २.५० वाजता समर्थ राऊळ महाराजांचा धार्मिक वेदोक्त जन्मोत्सव व सुहासिनींच्या हस्ते पाळणा झोका, सायंकाळी ४ वाजता श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमत् सद्गुरू वासुदेवानंद सरस्वती टेंब्येस्वामी महाराज नामस्मरण परिवार माणगावचे नामस्मरण, ५.३० वाजता राऊळ महाराज महिला मंडळाचे भजन, ६.४५ वाजता राऊळ महाराज समाधीस्थानी सांजआरती, ७.३० वाजता प. पू. राऊळ महाराजांच्या पादुकांची पालखी मिरवणूक (आई माऊली महिला ढोलपथकाच्या वाद्यांच्या गजरात), रात्री ९.३० वाजता बाबू गाडेकर यांच्या दामोदर बोगदेश्वर (गोवा) च्या दिंडीचे आगमन, १०.३० वाजता प. पू. राऊळनाथ नगरीतील नामवंत भजनी बुवांचे संयुक्त भजन होणार आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन सद्गुरू राऊळ महाराज संस्थान (पिंगुळी) चे कार्याध्यक्ष विठोबा राऊळ व समस्त विश्वस्त मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.
