कुडाळ | प्रतिनिधी
सांस्कृतिक विभाग भारत सरकार यांच्या सहयोगाने व दायती लोककला संवर्धन अकादमी पिंगुळी यांच्या आयोजनातुन दि. १७ व १८ ऑक्टोंबर रोजी पिंगुळी येथे चित्रकथी रामायण महोत्सव २०२४ चे आयोजन करण्यात आले आहे, चित्रकथी या कला प्रकाराला घेऊन आयोजित होणारा महोत्सव हा इतिहासातील पहिलाच महोत्सव असून दोन दिवस चालणाऱ्या या महोत्सवाच्या माध्यमातून जिल्ह्यातील -बांबूळी मंदिराचे बावलेकर अजय गंगावणे, यांचे सहकारी सुरेश रणसिंग, कुडाळ भैरव मंदिरचे बावलेकर सखाराम गंगावणे, ओरोस रवळनाथ मंदिरचे बावलेकर शिवदास मसगे, संस्कार मसके, घावनाळे रामेश्वर मंदिरचे बावलेकर लक्ष्मण मराठे, यांचे सहकारी श्री सुधाकर रणसिंग गावराई रामेश्वर मंदिरचे बावलेकर, रामदास म्हस्कर, भडगाव बिरोबा मंदिरचे बावलेकर, श्री विनायक मसगे, व अमर मसगे, झाराप भावई मंदिरचे बावलेकर श्री शंकर मसके व शैलेश मसके, पिंगुळी रवळनाथ मंदिर बावलेकर श्री लक्ष्मण मसके व विष्णू मसके असे अनेक नामवंत व सध्या कार्यरत असणारे चित्रकथी कलाकार या महोत्सवात सहभागी होत आपली कला सादर करणार आहेत. अशी माहिती दायती लोककला संवर्धन अकादमीचे अध्यक्ष श्री गणपत मसगे यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिली आहे.
या महोत्सवाचा लाभ तालुक्यातील चित्रकथी प्रेमी विद्यार्थ्यांना, कलाप्रेमीना तसेच अभ्यासकांना होणार आहे. तसेच हा महोत्सव कुडाळ तालुक्याच्या सांस्कृतीक परंपरेत मोलाची भर पाडणार ठरणार आहे. या महोत्सवात वैशिष्ट पुर्ण अशी चित्रकथी परंपरा, आपणास पाहायला मिळणार आहे,
या महोत्सवाच्या माध्यमातून जिल्ह्यातील चित्रकथी सादर करणाऱ्या कलाकारांना एका उत्तम असे व्यासपीठ मिळावे या साठी या महोत्सवाचे आयोजन केले आहे. या महोत्सवात १४ ते १५ चित्रकथी सादर करणारे कलाकार सहभागी होणार असून ते कोकणातील ही पारंपरिक अशी पुरातन कला रसिकांसमोर सादर करणार आहेत. शनिवार दि. १७ ऑक्टोंबर रोजी सायं. 5 वा. उदघाटन सोहळा होणार असून प्रमुख उदघाटक म्हणून प्रोफेसर डॉ. श्री. ओमप्रकाश भारती भारत सरकारचे पूर्व सांस्कृतिक राजनिथीक तथा पूर्व निर्देशक ई जेड सी सी कोलकाता, संस्कृति मंत्रालय, भारत सरकार हे उपस्थित राहणार आहेत. तसेच पिंगुळी सरपंच अजय आकेरकर, उपसरपंच सागर रणसिंग, जिल्हा ठाकर संघटनेचे अध्यक्ष शशांक अटक, पिंगुळी ठाकर ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष भगवान रणसिंग, ठाकर आदिवासी लोककला संवर्धन पर्यटन संस्था अध्यक्ष भास्कर गंगावणे, महापुरुष मित्र मंडळाचे अध्यक्ष गुंडू मसगे , दिग्दर्शक सिने लाईन प्रोडूसर साईनाथ दळवी ठाकरवाडी म्युझियमचे पदाधिकारी तुळशीदास मसगे , अच्युत मसगे, धोंडी ठाकूर हे उपस्थित राहणार आहेत. चित्रकथी सादरीकरण सायं. ६.३० वा. ” लवंकुश ” सदरकर्ते – सुरेश रणसिंग व विश्वास रणसिंग, ६.४५ वा. ” सीता स्वयंवर ” सादरकर्ते शंकर मसके व शैलेश मसके ७.३० वा. “पंचवटी” सादरकर्ते सखाराम गंगावणे व विवेक गंगावणे ८.१५ वा. “सुंदरकांड” शिवदास मसगे व संस्कार मसके, रविवार दि.१८ ऑक्टोंबर रोजी सायं. ५ वा. रामायण व चित्रकथी परंपरा” चर्चासात्र “सहभाग श्रीओमप्रकाश भारती, श्री सतीश लळीत, श्री. गणपत मसगे, श्री. गुंडू मसके ,श्री. शेखर सामंत, श्री ना.बा.रणसिंग सायं. ७.३० वा ” युद्धकांड “सदरकर्ते- विनायक मसगे व अमर मसगे, सायं. ८ वा. “बालकांड “सदरकर्ते- सुधाकर रणसिंग व आनंद ठाकूर, सायंकाळी ८.३० वा ” ताटीका वध” सादरकर्ते लक्ष्मण मसके व विष्णू मसके यासारखे नामवंत, कलाकार सहभागी होणार आहेत. चित्रकथी हा कलाप्रकार इयत्ता दहावीच्या अभ्यासक्रमामध्ये असल्यामुळे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनीही या महोत्सवाचा लाभ घ्यावा व जास्तीत जास्त संख्येने या महोत्सवासाठी उपस्थित राहावे असे आवाहन संस्था अध्यक्ष श्री गणपत मसगे व ठाकरवाडी म्युझियमच्या टीमने केले आहे तसेच तालुक्यातील व जिल्हयातील नागरिकांनी ही याचा लाभ घ्यावा.
