शासकीय कामात अडथळा आणि पुरावा नष्ट केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

0

अवैध वाळू वाहतूक प्रकरण 

कुडाळ | प्रतिनिधी

कुडाळ तहसील कार्यालय आवारातून पकडलेला डंपर घेऊन जाणाऱ्या अज्ञात दोन इसमान विरोधात कुडाळ पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणि पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस ठाण्यात नेरूर कार्यात नारूर कोतवाल सचिन खरात यांनी तक्रार दिली आहे.

अवैद्यरित्या वाळू वाहतूक करणारे डंपर पिंगुळी येथे पकडण्यात आले होते. आणि हे डंपर तहसील कार्यालयाच्या परिसरात ठेवण्यात आले होते दरम्यान यामधील डंपर नंबर (जीए- ०८- यु- ३३९८) हा अज्ञात दोन इसमानी या आवारातून बाहेर काढून जबरदस्तीने डंपर कुठेतरी घेऊन जाऊन या डंपरमध्ये असलेली वाळू उतरवून तो डंपर पुन्हा तहसील कार्यालयाच्या आवारात उभा केला या डपंरांची देखरेख करण्यासाठी कोतवाल सचिन खरात यांची नेमणूक करण्यात आली होती आणि त्यांच्या समोर ही घटना घडली याबाबत कुडाळ पोलीस ठाण्यात त्यांनी तक्रार दिली असून दोन इसमानविरोधात पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०९(४), १३२, २३८,३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.