ओमप्रकाश सिंह याला शोधण्यासाठी कुडाळ पोलिसांची मुंबई व झारखंड येथे पथके झाली रवाना

0

कुडाळ | प्रतिनिधी 

पत्नीचा खून करून पळून गेलेला ओमप्रकाश सिंह हा कुडाळ पोलिसांच्या अद्याप हाती आलेला नाही त्याला शोधण्यासाठी कुडाळ पोलिसांची दोन पथके रवाना झाली असून एक पथक मुंबई तर दुसरे पथक झारखंड येथे पाठविण्यात आले आहे असे खात्रीदायक वृत्त आहे. 

सेंट्रींगचे काम करणाऱ्या ओमप्रकाश सिंह यांनी आपल्या पत्नीचा चारित्र्याच्या संशयावरून खून करून तो पळून गेला कुडाळ कवीलगाव येथे राहणाऱ्या त्याच्या रिया या मुलीने पोलीस ठाण्यात आपल्या वडीला विरोधात तक्रार दाखल केली हा खून भडगाव धनगरवाडी येथे झाला दरम्यान खून करून पळालेल्या ओमप्रकाश सिंह यांच्या मोबाईल लोकेशन वरून कुडाळ पोलिसांनी मुंबई येथे पथक रवाना केले होते दरम्यान ओमप्रकाश सिंह यांनी आपला मोबाईल बंद केल्यामुळे पुढील लोकेशन पोलिसांना मिळाले नाही त्यामुळे ओमप्रकाश सिंह हा कुठे गेला असावा याचा सुगावा अद्याप पोलिसांना लागलेला नाही. ओमप्रकाश सिंह याच्या मुलाला पोलिसांनी विश्वासात घेऊन झारखंड येथील त्याच्या ठिकाणाबाबत विचारणा केली आहे आणि त्यानुसार एक पथक झारखंड येथे तपास कामासाठी पाठविण्यात आले आहे. तसेच त्याच्याशी संबंधित असलेल्या सगळ्या व्यक्तींची चौकशी केली जात आहे. 

पत्नीवर लक्ष ठेवण्यासाठी ठेवले होते पगारी कामगार 

ओमप्रकाश सिंह याला आपल्या पत्नीवर संशय होता आपली पत्नी परपुरुषाबरोबर फिरते त्यामुळे त्याने काही व्यक्ती पगारी ठेवून तिच्यावर लक्ष ठेवण्यासाठी ठेवले होते आपली पत्नी कोणाला भेटते कोणासोबत जाते याकडे लक्ष ठेवण्यासाठी हे पगारी कामगार ठेवले होते अशी माहिती त्याच्या साडूने दिली आहे तसेच तो कर्जबाजारी असल्याचेही तपासात उघड होत आहे. हा आरोपी लवकरच सापडेल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.