महसूल विभागाने अनधिकृत वाळू वाहतूक करणारे डंपर पकडले वाळू व्यावसायिक व अधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची

0

कुडाळ | प्रतिनिधी 

कुडाळ महसूल विभागाच्यावतीने मध्यरात्री पिंगुळी येथे अनधिकृत वाळू वाहतूक करणारे तीन डंपर पकडले दरम्यान पकडलेल्या तीन डंपर पैकी एका डंपर चालकाने तहसील कार्यालय येथे उभा करून ठेवलेला डंपर परस्पर घेऊन गेला आणि वाळू उतरवून पुन्हा डंपर कार्यालयाच्या ठिकाणी आणला याप्रकरणी डंपर चालकाविरुद्ध महसूल विभागाकडून कुडाळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे तसेच या संदर्भात वाळू व्यवसायिकांनी नायब तहसीलदार प्रतीक आढाव यांना जाब विचारला. 

गेले काही दिवस महसूल विभागाच्या वतीने अनधिकृत वाळू वाहतूक करणारे डंपर पकडले जात असून काल मध्यरात्री पिंगुळी वडगणेश येथे कुडाळवरून गोव्याच्या दिशेने जाणारे तीन डंपर पकडले यामध्ये अनधिकृत वाळू वाहतूक केले जात असल्याचे निदर्शनास आले ही वाहतूक नायब तहसीलदार प्रतीक आढाव यांच्यासह तलाठी व अन्य महसूल कर्मचाऱ्यांनी केली आणि डंपर तहसील कार्यालय येथे आणण्यात आले दरम्यान तहसील कार्यालय येथे आणण्यात आलेल्या एका डंपर चालकाने कार्यालयात हा डंपर बाहेर काढून या डंपर मधील वाळू इतर ठिकाणी ओतली आणि हा डंपर पुन्हा कार्यालयाच्या ठिकाणी उभा केला या डंपरांची पाहणी करण्यासाठी ठेवलेल्या कोतवाल यांनी यासंदर्भात अधिकाऱ्यांना सांगून कुडाळ पोलीस ठाण्यात तहसील कार्यालयाच्या परिसरातील डंपर घेऊन जाऊन त्या डंपर मधील अनधिकृत वाळू ओतून पुन्हा डंपर या ठिकाणी लावण्यात आला त्यानुसार कुडाळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे 

दरम्यान या संदर्भात वाळू व्यवसायिकांनी नायब तहसीलदार प्रतीक आढाव यांना रात्री कार्यालयात घेराव घालून जाब विचारला यामध्ये तलाठ्यांची वैद्यकीय तपासणी करा तसेच शासकीय गाड्या का वापरत नाहीत? एखादी दुर्घटना झाली तर जबाबदार कोण राहणार? असे प्रश्न विचारण्यात आले मात्र महसूल विभागाकडून केली जाणारी कारवाई न थांबवता ही कारवाई पूर्ण करण्यात आली.