अखेर जांभवडे हायस्कूल समोर एस.टी. थांबा असल्याचे मान्य ; ग्रामस्थांचे आंदोलन स्थगित

0

कुडाळ | प्रतिनिधी 

जांभवडे न्यू शिवाजी हायस्कूल समोर एसटी बस थांबा करण्यासाठी संस्थाचालकांसह शिक्षक विद्यार्थी व ग्रामस्थांनी केलेल्या आंदोलनाला यश आले असून हा थांबा एसटी बस प्रशासनाकडून मान्य करण्यात आला आहे यासाठी भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख निलेश राणे, आमदार वैभव नाईक यांनी प्रयत्न केले. या ठिकाणी बस थांबण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व लोकप्रतिनिधी ग्रामस्थ यांचे माध्यमिक शिक्षण समिती जांभवडे पंचक्रोशी संस्थेचे अध्यक्ष सुभाष मडव यांनी आभार व्यक्त केले आहेत.

न्यू शिवाजी हायस्कूल जांभवडे येथे अधिकृत एस.टी. थांबा असून सुध्दा कुडाळ आणि कणकवली आगाराच्या बसेस विद्यार्थ्यांसाठी थांबविल्या जात नव्हत्या. याबाबत एस. टी. प्रशासनाला वेळोवेळी निवेदन देऊन सुध्दा त्याचा गांभिर्याने विचार केला गेला नाही. दि. ४ ऑक्टोंबर रोजी सायं. ४ वा. पासधारक विद्यार्थ्यांना त्याठिकाणी बस थांबविण्यात आली नाही. त्यामुळे त्या दिवशी मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, पालक, संस्थाचेअरमन, संस्था पदाधिकारी यांनी उत्स्फूर्तपणे रास्ता रोको आंदोलन केले होते. त्यावेळी एस.टी. प्रशासनाकडून संबंधितांवर कुडाळ पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल करण्यात आले. त्यावर संतप्त प्रतिक्रिया म्हणून दि. १४ ऑक्टोंबर रोजी जांभवडे पंचक्रोशी मार्फत विद्यार्थी, पालक, संस्थाचालक, ग्रामस्थ यांनी मुलांच्या हितासाठी एस. टी. न थांबविल्यास रास्ता रोको करणार असल्याचे निवेदन कुडाळ पोलीस स्टेशन आणि एस.टी. प्रशासनाला दिले. जांभवडे हायस्कूल विनंती बस थांबा करीता खासदार नारायण राणे यांचे स्विय सहाय्यक श्री संदीप भोसले तसेच माजी खासदार निलेश राणे यांनी विभाग नियंत्रक म. रा. परिवहन मंडळ तसेच पोलीस निरीक्षक कुडाळ यांना दूरध्वनीवर संपर्क साधून सक्त सूचना देऊन एस. टी. थांबा मार्गी लावणे बाबत प्रत्यक्ष सहकार्य केले. तसेच आमदार वैभव नाईक यांनीही शिफारस पत्र देऊन बस थांबविण्यासाठी आग्रही भूमिका घेतली. आज या अनुषंगाने कुडाळ पोलीस स्थानकचे पोलीस निरीक्षक मगदूम यांनी चर्चा करण्यासाठी आवळेगावला पोलीस ठाण्याला संस्थाचे अरमन श्री. सुभाष मडव, पालक व एस. टी. प्रशासन यांना निमंत्रित केले होते. या समस्येबाबत पोलीस निरीक्षक मगदूम यांनी यशस्वी मध्यस्थी केली. व एस. टी. प्रशासनाने जांभवडे हायस्कूलच्या समोर पूर्वी मंजूर असलेल्या अधिकृत विनंती एस. टी. थांब्यावर आज दि. १४ ऑक्टोबर रोजी पासून नियमित एस. टी. थांबविण्याचे मान्य केले आहे. यासाठी माध्यमिक शिक्षण समिती जांभवडे पंचक्रोशी या शिक्षण संस्थेचे चेअरमन सुभाष मडव, श्री नारायण गावडे, दिलीप तवटे, लवू घाडी, वा. शि. परब, रामदास मडव, श्री मनोहर गावकर, बाळकृष्ण तेरसे, दिनकर आरवारी, बाबी गुरव, श्रीधर सावंत, महेश सावंत, अमोल तेली, अनिल परब, संजय घाडी, गुरुनाथ मेस्त्री, बाबा परेरा, संतोष पवार, दिवाकर परब, रुपेश घाडी, दयानंद मडव, सचिन तेली, नंदू सरंगलेव तसेच संस्था प्रतिनिधी, महिला, अनेक पालक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. याबाबत पोलीस निरीक्षक श्री. मगदूम व एस. टी. चे अधिकारी श्री यादव यांचे सहकार्य लाभले.