आचरा येथे लाखो रूपयांचे सोन्याचे दागिने केले लंपास

0

आचरा | प्रतिनिधी

सोने खरेदीच्या बहाण्याने आलेल्या दोन इसमांनी दुकानदाराला बोलण्यात गुंतवून तब्बल सव्वादोन लाख रुपयांच्या सोन्याचे दागिने लंपास करण्याची घटना बुधवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास आचरा बाजारपेठ येथील साईप्रसाद ज्वेलर्स दुकानात घडली.

सोने खरेदी करण्याचा बहाणा करत दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यानी काउंटरवरील ठेवलेला सोन्याच्या दागिन्याचा पाऊच लांपास केला. काउंटरवर टी असलेला पाऊच गायब झाला असल्याचे दुकान मालक अरुण कारेकर यांच्या काहीवेळाने लक्षात येताच बाजूच्या व्यापाऱ्यांना सांगत पोलीसांना त्यांनी खबर दिली. सदर अज्ञात चोरटे आचरा बाजारातील काही दुकानाच्या व आचरा तिठा येतील रस्त्यावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही मध्ये दिसून आले आहेत. सदर घटनेची फिर्याद दाखल करण्याचे काम आचरा पोलीस ठाण्यात चालू होते.