कुडाळ | प्रतिनिधी
विविध टीव्ही चॅनल तसेच नाटकामधून आपल्या अभिनयाने रसिकांना आपलेसे करणारे कुडाळ शहरातील ज्येष्ठ नाट्य आणि सिने कलाकार तसेच माधुर्य हॉटेलचे नित्यानंद जडये यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले त्यांच्यावर कुडाळ शहरातील सार्वजनिक स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.
क्षेत्रपाल श्री देव वेतोबा या लोकप्रिय मालिकेतील भिकू काका (वेतोबाचे पुजारी) ही भूमिका साकारणारे तसेच रात्रीस खेळ चाले या मालिकेमध्ये उत्तम भूमिका करणारे जेष्ठ नाट्य आणि सिने कलाकार नित्यानंद जडये यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन बुधवार दि. १६ ऑक्टोबर रोजी रात्री ११:३० वा. च्या दरम्याने झाले. त्यांनी अनेक नाटकांमध्ये अभिनय केला. शशांक जडये यांचे ते वडील होत.
