दि. १८, १९, २० आक्टोबर रोजी होणार महोत्सव
कुडाळ | प्रतिनिधी
नर्मदाआई महिला औद्योगिक सहकारी संस्थेच्या माध्यमातून दिवाळी निमित्त विशेष प्रदर्शन व खरेदी महोत्सव २०२४ हा दि. १८, १९, २० आक्टोबर रोजी दुपारी ३ ते रात्री ९ या वेळात महालक्ष्मी हॉल कुडाळ येथे आयोजित करण्यात आला आहे.
यावर्षी चे विषेश म्हणजे राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची ३०० वी जयंती वर्ष साजरं होत आहे. महिला सबलीकरणाचा राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी घेतलेला वसा पुढे नेत नर्मदाआई संस्था ३०० व्या जयंती वर्षाचे औचित्य साधत महिला सबलीकरणाच्या कार्यात सक्रीय असणा-या गावातील शेवटच्या महिलेला सक्षमीकरणाच्या प्रवाहात घेऊन येणा-या कुडाळ तालुक्यातील ग्रामीण भागात कार्यरत असणाऱ्या महिलांचा ( एकुण ३०० दररोज १००) राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्काराने सन्मान करत त्यांच्या उमेदीला भरारी देण्यासाठी बळ देण्याचा छोटासा प्रयत्न नर्मदाआई करत आहे.
हा तीन दिवसांचा महोत्सव नर्मदाआई संस्थेच्या वतीने राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना आदरांजली म्हणून समर्पित करण्यात येत आहे. समाजातील सर्व स्तरातील महिलांनी उपस्थित रहावे असे आवाहन नर्मदाआई महिला औद्योगिक सहकारी संस्था अध्यक्ष सौ.संध्या प्रसाद तेरसे यांनी केले आहे.
