अवैद्य वाळू वाहतूक प्रकरण
कुडाळ | प्रतिनिधी
कुडाळ तहसील कार्यालयाच्या आवारातून महसूल विभागाने पकडलेला डंपर घेऊन जाऊन या डंपर मधील वाळू अन्यत्र उतरवून पुन्हा हा डंपर तहसील कार्यालयाच्या आवारात उभा करून ठेवणाऱ्या चालक विकास जोगेश्वर सिंह (रा. गोवा-पेडणे, मूळ रा. झारखंड) व महादेव उर्फ अक्षय अरुण घाडी (रा. नेरूर) यांना कुडाळ पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने ठोठावली आहे.
पिंगुळी वडगणेश येथे महसूल विभागाने अवैद्य वाळू वाहतूक करणाऱ्या डपंरांना पकडले होते. आणि हे डंपर तहसील कार्यालय आवारात उभे करून ठेवले होते. या डंपरवर लक्ष ठेवण्यासाठी कोतवाल सचिन खरात याच्याजवळ जबाबदारी होती आणि पकडलेल्या डंपर पैकी एक डंपर तहसील कार्यालयाच्या आवारातून बाहेर काढून हा डंपर अन्यत्र घेऊन जाऊन त्या डंपरमध्ये असलेली अवैद्य वाळू ओतून पुन्हा हा डंपर तहसील कार्यालयाच्या आवारात उभा करण्यात आला होता याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान याप्रकरणी चालक विकास सिंह व महादेव घाडी याला कुडाळ पोलिसांनी पकडून कुडाळ न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
हा डंपर गोवा येथील असून या डंपर मालकाकडून महादेव उर्फ अक्षय घाडी यांने स्वतः व्यवसाय करण्यासाठी भाडेतत्त्वावर घेतला आहे. ज्या दिवशी हा डंपर पकडला त्यावेळी डंपर मालकाला महादेव घाडी यांने फोन लावण्यात आला आणि डंपरची दुसरी चावी आहे का असे विचारून हा डंपर आवारातून बाहेर काढायचा आहे असे सांगितले होते. त्यावेळी त्या मालकाने कारवाई होऊ दे पण डंपर आवारातून बाहेर काढू नको असे सांगितले होते तरी महादेव घाडी याने खिळ्याच्या सहाय्याने या हा डंपर सुरू करून आवाराच्या बाहेर काढला. दरम्यान शासकीय कामात अडथळा करून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता विकास सिंह व महादेव घाडी यांनी पकडलेली वाळू कुठे टाकली याचा तपास करण्यासाठी पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
