सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फोंडा घाट पोलीस चेक पोस्ट येथे १४ लाख रुपयांची रोख रक्कम आली मिळून

0

कणकवली | प्रतिनिधी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फोंडा घाट पोलीस चेक पोस्ट येथे कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या होंडा व्हेन्यु कारची तपासणी केली असता या कारमध्ये १४ लाख ४५ हजार ४०० रुपयांची रोख रक्कम मिळून आली दरम्यान याबाबत कणकवली पोलीस ठाणे येथे याबाबत कळविण्यात आले आहे.

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे केंद्रीय निवडणूक आयोगाकडून प्राप्त झालेल्या सूचनेनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फोंडाघाट पोलीस चेक पोस्ट येथे कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार नितीन बनसोडे, उद्देश कदम हे कोल्हापूर व कणकवलीच्या दिशेने जाणारी- येणारी वाहने तपास करीत असताना त्यांना कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या होंडा व्हेन्यु कार क्रमांक (एमएच- ०९- जीए- ९४३९) व चालकावर संशय आल्याने या कारची तपासणी केली असता कारमध्ये १४ लाख ४५ हजार ४०० एवढी रोख रक्कम मिळून आली. सदर रक्कमेबाबत कारचालक जयसिंग मल्हारी पाटील (रा. माळवाडी, चिंचवड, ता. करवीर, जि. कोल्हापूर) यांच्याकडे विचारपूस करता त्यांनी समाधानकारक उत्तर न दिल्याने वाहन व वाहनातील १४ लाख ४५ हजार ४०९ रुपये रोख रक्कम पंचनामा समक्ष जप्त करून कणकवली पोलीस ठाणे येथे आणण्यात आली तसेच रक्कमेची पुढील कारवाईसाठी संयुक्त आयकर निर्देशक, अन्वेषण युनिट-०३ कोल्हापूर यांना कळविण्यात आले आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कणकवली प्रभारी पोलीस ठाणे अधिकारी यांच्या सूचनेप्रमाणे पोलीस अमलदार नितीन बनसोडे व उद्देश कदम यांनी फोंडा चेक पोस्ट येथे केली आहे.