मालवण | प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे भागांची जोडणी तसेच आतील बाजुस आधार देण्यासाठी वापरलेल्या साहित्याची जोडणी (वेल्डींग) करण्याचे काम परमेश्वर रामनरेश यादव (रा. मिर्झापूर, रा. उत्तरप्रदेश) यास अटक करून न्यायालयात हजर केले असता तीन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी ही माहिती दिली
मालवण पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर १३३/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०९, ११०, १२५, ३१८, ३ (५) सहकलम ३ सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक अधिनियम अन्वये दिनांक २६ ऑगस्ट २०२४ रोजी दाखल आहे.
सदर गुन्हयाच्या तपासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळयाचे वेगवेगळ्या सुट्या भागांची जोडणी करीत असतांना जोडणीसाठी कमकुवत व निकृष्ठ दर्जाचे साहित्य वापरल्यामुळे संपुर्ण पुतळयाचे जोडणीला मजबुती व टिकाऊपणा आला नसल्याचे, तसेच पुतळयाचा प्रत्येक भाग जोडतांना पुर्णपणे भाग जोडले गेले आहेत याची खात्री न करता आणखी भाग (पार्ट) जोडल्या गेल्यामुळे पुतळ्याचे प्रत्येक भागाला आवश्यक अशी मजबुती मिळु शकली नाही, तसेच पुतळयाचे आतील बाजुस आधारासाठी वापरलेले लोखंडी साहित्य (बिम, अँगल, सळई ईत्यादी) हे कमकुवत व निकृष्ठ दर्जाचे वापरल्याने आतील बाजूस गंज लागून पुतळा कोसळयाची दुर्घटना घडल्याचे तांत्रीक तपासामध्ये निष्पन्न झालेले आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे भागांची जोडणी तसेच आतील बाजुस आधार देण्यासाठी वापरलेल्या साहित्याची जोडणी (वेल्डींग) करण्याचे काम परमेश्वर रामनरेश यादव रा. मिर्झापूर राज्य उत्तरप्रदेश यास देण्यात आले होते. गुन्हयाचे तपासामध्ये त्याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास आज दिनांक १७ ऑक्टोबर २०२४ रोजी अटक करण्यात आली असुन मा. न्यायालयाने त्यास ३ दिवसांची पोलीस कोठडी दिलेली असुन गुन्हयाचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी, कणकवली श्री घनश्याम आढाव हे करीत आहेत.
