जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा विद्यालयाची वैभवी खानोलकर व्दितीय 

0

कणकवली | प्रतिनिधी 

धम्मचक्र प्रवर्तन दिन निमित्त दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया जिल्हा शाखा व महिला जिल्हा शाखा सिंधुदुर्गच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा नुकतीच कणकवली विद्या मंदिर या ठिकाणी संपन्न झाली.

या स्पर्धेत निबंधासाठी भारतीय संविधान समोरील आव्हाने हा विषय देण्यात आला होता. या स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा वेंगुर्ला विद्यालयाची इयत्ता नववीच्या वैभवी संदेश चिपकर या विद्यार्थ्यांनीने सहभाग घेऊन जिल्हात व्दितीय क्रमांक पटकावला तिला मान्यवरांच्या हस्ते मानचिन्ह, सन्मानपत्र, रोख रक्कम आणि पुस्तक देऊन गौरविण्यात आले. या यशस्वी विद्यार्थ्यांनीला या प्रशालेचे लिपिक अजित केरकर आणि उपक्रमशील अध्यापक वैभव खानोलकर यांनी विशेष मार्गदर्शन केले. या जिल्ह्यास्तरीय निंबध स्पर्धेतील मिळवलेल्या उल्लेखनीय यशाबद्दल न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा वेंगुर्ले हायस्कूलचे मुख्याध्यापक उमेश वाळवेकर, संस्था अध्यक्ष विरेंद्र आडारकर कामत, सचिव जेष्ठ रांगोळीकार रमेश नरसुले, उपाध्यक्ष निवृत्त गट शिक्षणाधिकारी रमेश पिगुळकर, निलेश मांजरेकर , राधाकृष्ण मांजरेकर, सुनिल परब आणि सर्व पदाधिकारी यांनी वैभवी चिपकर व मार्गदर्शक शिक्षक खानोलकर सर व अजित केरकर या बरोबरच या विद्यार्थ्यांनीच्या पालकाचे ही विशेष अभिनंदन केले असुन या स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या या प्रशालेचे आणि विद्यार्थ्यांनीचे ही सर्व स्तरातून विशेष कौतुक केले जात आहे.