सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये घडली रॅगिंगची घटना

0

सिंधुदुर्गनगरी | प्रतिनिधी 

जिल्ह्यातील एका शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रॅंगिगचा प्रकार घडला आहे याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्याजवळ तक्रारी अर्ज केल्याचे खात्रीदायक वृत्त आहे 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये दुसऱ्या वर्षी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी पहिल्या वर्षाच्या शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर रॅंगिग केले आहे याबाबत महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांच्या जवळ अडीच पाने असलेला तक्रारी अर्ज दाखल झाला अधिष्ठाता यांनी हा अर्ज पोलीस अधीक्षक यांच्याजवळ दिला आहे दरम्यान अँटी रॅगिंग समितीची याबाबत सभा होणार आहे आणि त्यामध्ये पुढील निर्णय घेतला जाणार आहे अशी माहिती समोर आली आहे.