Sunday, July 26, 2026
Google search engine
Homeआपलं कुडाळमहाराष्ट्रात आम आदमी पक्ष दोन जागा मागणार :- गोवा प्रदेशाध्यक्ष अमित पालेकर

महाराष्ट्रात आम आदमी पक्ष दोन जागा मागणार :- गोवा प्रदेशाध्यक्ष अमित पालेकर

कुडाळ | प्रतिनिधी

आम आदमी पक्षाकडून महाराष्ट्र विधानसभेच्या दोन जागा लढवण्याची इच्छा असल्याचे आम आदमी पक्षाचे गोवा राज्य प्रदेशाध्यक्ष अमित पालेकर यांनी सांगून महाराष्ट्रात इंडिया आघाडीला कोणतेही प्रकारचे नुकसान होणार नाही याची काळजी आम्ही घेणार आहोत असे त्यांनी कुडाळ येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले 

आम आदमी पक्षाची कुडाळ येथील यशदारा हॉटेलमध्ये पत्रकार परिषद झाली या पत्रकार परिषदेला सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर, जिल्हा सचिव मीली मिश्रा, युवा जिल्हाध्यक्ष आदित्य बटावले, जिल्हा कार्यकारिणी सदस्य दीपेश आजवेलकर उपस्थित होते. 

यावेळी आम आदमी पक्षाचे गोवा प्रदेशाध्यक्ष अमित पालेकर म्हणाले की, उबाठा शिवसेना, काँग्रेस शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत आमची इंडिया आघाडी आहे आणि या इंडिया आघाडीमध्ये आम्ही घटक पक्ष असल्यामुळे या ठिकाणी महाविकास आघाडीचे सरकार येण्यासाठी विविध ठिकाणी आम्ही सहभाग घेणार आहोत तसेच महायुतीने केलेले नुकसानीचे राजकारण हे आम्ही दाखवून देणार आहोत. महाराष्ट्र हा सदन प्रदेश आहे पण यामध्ये विकासात्मक राजकारण दिसत नाही असे सांगून महाराष्ट्रात आम आदमी पक्ष वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न सुरू केले आहेत त्यासाठी सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रत्नागिरी आणि मुंबईमध्ये आमच्या सभा होणार आहेत. आणि याचा फायदा महाविकास आघाडीला सुद्धा होणार आहे येत्या विधानसभा निवडणूक मध्ये ज्या ठिकाणी आमची ताकद आहे त्या ठिकाणी आम्ही आमच्या पक्षासाठी दोन जागा मागणार आहोत जरी या जागा दिल्या नाहीत तरी इंडिया आघाडीचा प्रचार आम्ही करणार आहोत असे त्यांनी यावेळी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!