सिंधुदुर्ग | प्रतिनिधी
विधानसभेची निवडणूक 20 नोव्हेंबरला होत आहे या निवडणुकीत मतदान करण्यासाठी आपण मतदार यादीत नसाल तर मतदार यादीत नाव नोंदणीसाठी 19 ऑक्टोबर ही शेवटची तारीख आहे तोपर्यंत आपण मतदार होऊ शकता यासाठी वोटर हेल्पलाइन ॲप वोटर्स डॉट इ सी आय डॉट जीओव्ही डॉट इन या वेबसाईटवर ऑनलाइन अर्ज क्रमांक सहा करू शकता तसेच मतदान नोंदणी अधिकारी कार्यालयात जाऊन मतदार होऊ शकता या संदर्भात 1800– 22- 1950 या हेल्पलाइनची मदत घेऊ शकता 1 ऑक्टोंबर 2024 पर्यंत वयाची 18 वर्षे पूर्ण केलेले तरुणही मतदार होण्यास पात्र आहेत त्या सर्वांनी आपल्या नावाची नोंदणी करावी असे आवाहन जिल्हाधिकारी अनिल पाटील आणि जिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे यांनी केले आहे मतदानाची अंतिम यादी पूर्ण करण्याची तारीख ही नामांकन प्रक्रिया होईपर्यंत सुरू असते त्यामुळे ज्या मतदारांनी आपल्या नावाची नोंद केलेली नाही त्या सर्वांनी आपली नावे शनिवार दिनांक 19 ऑक्टोबर पर्यंत मतदार यादीत समाविष्ट होईल यासाठी प्रयत्न करावेत
वोटर हेल्पलाइन वरून मिळवा माहिती
ऐन निवडणुकीच्या दिवशी आपले नाव मतदान यादीत नसल्याचे अनेकांना माहीत होते आपले मतदान केंद्र बदलल्याचे कळते मात्र या संदर्भात प्रत्येक नागरिकाने सतर्कता बाळगणे आवश्यक आहे आपण मोबाईलवर वोटर हेल्पलाइन ॲप डाऊनलोड करून आपणास* *याबाबतची माहिती मिळू शकते घरातील तरुणांनी जेष्ठा नाही या संदर्भात मदत करावी पात्र मतदारांची नावे कुठे आहेत हे तपासून घ्यावे असे आवाहनही जिल्हा प्रशासनाने केले आहे
