Saturday, July 12, 2025
Google search engine
Homeसिंधुदुर्ग जिल्हामालवणमत्स्य व्यवसाय विभागाच्या पथकाने मालवण समुद्रात पकडला परप्रांतीय ट्रॉलर

मत्स्य व्यवसाय विभागाच्या पथकाने मालवण समुद्रात पकडला परप्रांतीय ट्रॉलर

मालवण | प्रतिनिधी 

मालवणच्या समुद्रात अनधिकृतपणे मासेमारी करणारा कर्नाटक मलपी येथील वायूपुत्र -२ (क्र. IND-KA-02-MM-5812) हा परप्रांतीय ट्रॉलर मत्स्य व्यवसाय विभागाच्या पथकाने समुद्रात गस्त घालत असताना पकडला आहे. हा ट्रॉलर पकडून सर्जेकोट बंदरात आणण्यात आला आहे. 

मालवणच्या समुद्रात परराज्यातील ट्रॉलर्सचा धुमाकूळ वाढला असून परराज्यातील ट्रॉलर्स हे स्थानिक मच्छिमारांचे नुकसान करतात आजही हे ट्रॉलर्स मालवण च्या समुद्रात मच्छिमारी करीत होते त्यामुळे संतप्त बनलेल्या स्थानिक मच्छिमारांनी ही गोष्ट मत्स्यव्यवसाय विभागाच्या कानावर घातल्यानंतर मत्स्यव्यवसाय विभागा ने कारवाई केली मत्स्यव्यवसाय विभाग सिंधुदुर्गचे सहाय्यक आयुक्त सागर कुवेसकर यांच्या मार्गदर्शनाखाली मत्स्य परवाना अधिकारी मालवण मुरारी भालेकर यांच्यासह सागरी सुरक्षा रक्षक दीपेश मायबा, सागर परब, मिमोह जाधव, राजेश कुबल, प्रणित मुणगेकर, स्वप्नील सावजी व पोलीस कॉन्स्टेबल व्ही. व्ही. पाटोळे हे आज मालवणच्या समुद्रात गस्त घालत असताना १० ते १२ परप्रांतीय ट्रॉलर महाराष्ट्र राज्याच्या जलाधी क्षेत्रात अवैधरित्या मासेमारी करताना दिसून आले. यावेळी मत्स्य व्यवसाय विभागाच्या गस्ती पथकाने या ट्रॉलर्सचा पाठलाग करत यातील कर्नाटक- मलपी येथील वायुपुत्र-२ हा ट्रॉलर पकडला. या ट्रॉलरवर सात खलाशी होते. तर पापलेट, सौंदाळा, बांगडा, सुरमई, कट्टर, बळा, कटल यांसह अन्य मासे या ट्रॉलर मध्ये आढळून आले. हा ट्रॉलर पकडून सर्जेकोट बंदरात आणण्यात आला. पकडलेल्या ट्रॉलरच्या मालकाविरुद्ध महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियमन १९८१ अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती मत्स्य परवाना अधिकारी मुरारी भालेकर यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!