कणकवली विधानसभेत मनसे उमेदवार उभा करणार त्यादृष्टीने मुंबईस्थित रहिवासी महत्वपूर्ण बैठक संपन्न

0

मुंबई | वृत्तसेवा

कणकवली विधानसभेतील मुंबईस्थित रहिवाशांचा मेळावा आज मुंबई मधील मीरारोड येथील शिवार गार्डन सभागृह, वर्धमान फॅनटसी या ठिकाणी पार पडला. सदर मेळाव्यास कणकवली विधानसभा क्षेत्रातील मुंबई स्थित सुमारे ३०० जण रहिवाशी उपस्थित होते. या मेळाव्याचे आयोजन मनसेचे कणकवली विधानसभा संपर्क अध्यक्ष श्री. संतोष भाऊ शिंगाडे यांनी केले होते.

 सदर मेळाव्यात प्रमुख उपस्थिती मनसेचे मीरा-भाईंदर शहर अध्यक्ष संदिप राणे यांची होती. यावेळी मनसेचे कणकवली तालुका संपर्क अध्यक्ष विश्राम लोके, देवगड संपर्क अध्यक्ष नितीन पवार, मनसे उपविभाग अध्यक्ष हेमंत कासले, मनसे विद्यार्थी सेनेचे सिंधुदुर्ग जिल्हा संपर्क अध्यक्ष ज्ञानेश्वर मोरे, वैभववाडी संपर्क अध्यक्ष विवेक कुडतरकर, सहसंपर्क अध्यक्ष अमोल खोत,प्रशांत पेंडूरकर, अक्षय बागवे,समीर कदम,विजय तर्फे, अमित जाधव, मंगेश कातवणकर उपस्थित होते. यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. प्रसंगी शहर अध्यक्ष संदिप राणे आणि कणकवली विधानसभा संपर्क अध्यक्ष संतोष शिंगाडे यांनी उपस्थित कोकणवासियांना मार्गदर्शन केले