आमदार वैभव नाईक यांनी केले शक्ती प्रदर्शन ; रॅलीने केला उमेदवारी अर्ज दाखल

0

कुडाळ | प्रतिनिधी 

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार वैभव नाईक यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना गर्दी केली होती यावेळी शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला 

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या पहिल्या यादीत आमदार वैभव नाईक यांना स्थान मिळाल्यानंतर त्यांनी आज गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे निश्चित केले यासाठी कुडाळ येथील अनंत मुक्ताई समोरील मैदानावर सभा घेऊन रॅलीने अर्ज दाखल केला या रॅलीमध्ये शिवसैनिकांची अल्लोट गर्दी उसळली होती कुडाळ शहर भगवामय करून सोडला होता. या रॅलीमध्ये शिवसेनेसह काँग्रेस शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.