आमदार वैभव नाईक यांचा उमेदवारी अर्ज भरताना भगवे वादळ घोंगावले

0

कुडाळ | प्रतिनिधी

कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघातून आज गुरुवारी गुरुपुष्प अमृत मुहूर्तावर विद्यमान आमदार वैभव नाईक यांनी आपला उमेदवारी अर्ज ठाकरे शिवसेनेकडून दाखल केला यावेळी त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले मतदार संघातील शिवसैनिकांचे भगवे वादळ घोंगावले, आणि आमदार वैभव नाईक यांनी शक्ती प्रदर्शन करून दाखवले आमदार वैभव नाईक या मतदारसंघात विजयाची हॅट्रिक करतील असा विश्वास महाविकास आघाडीच्या उपस्थित नेत्यांनी व्यक्त केला. येथील प्रांत कार्यालयात त्यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकारी ऐश्वर्या कालुसे यांच्याकडे दाखल केला. यावेळी माजी आमदार परशुराम उपरकर जिल्हाप्रमुख संजय पडते राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अभय शिरसाट आदी उपस्थित होते। वैभव नाईक उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याने आज कुडाळ मालवण मतदारसंघातून शिवसेना कार्यकर्ते समर्थक कुडाळमध्ये सकाळपासून दाखल झाले कार्यकर्त्यांनी तोबा गर्दी केली होती भगवे वादळच घोंगावले होतेउद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या पहिल्या यादीत आमदार वैभव नाईक यांना स्थान मिळाल्यानंतर त्यांनी आज गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे निश्चित केले यासाठी कुडाळ येथील अनंत मुक्ताई समोरील मैदानावर सभा घेऊन रॅलीने अर्ज दाखल केला या रॅलीमध्ये शिवसैनिकांची अलोट गर्दी उसळली होती कुडाळ शहर भगवामय करून सोडला होता. सभा संपल्यानंतर रॅलीने उपस्थित शिवसैनिक प्रांत कार्यालयाच्या दिशेने रवाना झाले भगव्या टोप्या परिधान केलेले शिवसैनिक लक्ष वेधून घेत होते भगवे झेंडे फडकावीत वैभव नाईक यांच्या प्रतिमेचे बॅनर हातात घेऊन रॅली घोषणाबाजी करीत प्रांतकार्यालयाच्या दिशेने निघाली वैभव नाईक आगे बढो हम तुम्हारे साथ है आदी घोषणांनी परिसर दुमदुमून सोडला रणरणत्या उन्हाची तमा न बाळगता शिवसैनिकांनी उपस्थित राहून उस्फुर्त प्रतिसाद दिला हजारोच्या संख्येने शिवसैनिक या रॅलीमध्ये सहभागी झाले त्यानंतर काही मोजक्याच पदाधिकाऱ्यांसमवेत जाऊन वैभव नाईक यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी ऐश्वर्याकालुसे यांच्याकडे सादर केला यावेळी कुडाळचे तहसीलदार वीरसिंग वसावे मालवणच्या तहसीलदार वर्षा झालटे उपस्थित होत्यारॅलीमध्ये शिवसेनेसह काँग्रेस शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.