“शिवधनुष्य” योग्य हातातच दिले जाते आणि म्हणूनच ते वैभव नाईक यांना बाहेर ठेवत निलेश राणेंच्या हाती देण्यात आले आहे
कुडाळ | प्रतिनिधी
शिवसेनेचे शिवधनुष्य हे समर्थ प्रामाणिक आणि सच्च्या हातातच शोभून दिसते. ते टिकवण्यासाठी अंगात नैतिक बळ लागते. आमदार वैभव नाईक तर दूरची गोष्ट, तुमचे नेते उद्धव ठाकरे यांनाही ते पेलवले नाही, म्हणून निवडणूक आयोगाने ते विश्वासाने एकनाथ शिंदे यांच्या हाती सोपवले आहे. उबाठाचे हरी खोबरेकर म्हणतात त्याप्रमाणे वैभव नाईकांच्या हाती शोभून दिसायला शिवसेनेचे शिवधनुष्य ही शोभेची वस्तू नव्हे. ज्यांना आजवर हे समजले नाही त्यांनी स्वतःला शिवसैनिक म्हणून घेणे लज्जास्पद आहे, अशी टीका शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा प्रवक्ते श्री रत्नाकर जोशी यांनी केली आहे.
राणेनी शिवधनुष्य हाती घेतले तेव्हा कुडाळातील प्रस्थापित आमदाराचे आसन डळमळले असल्याचे संकेत व्यासपिठावरून मिळाले, हा कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघासाठी शुभ संकेत होता. त्यामुळे नको त्या विषयावरून राजकारण करण्याची सवय हरी खोबरेकर यांनी सोडून द्यावी. शिवसेनेचा मेळावा म्हणजे बचत गट मेळावा म्हणत त्याने महिलांच्या बचत आणि संघटन शक्तीचा जाहीर अपमान केला आहे. निवडणुकीत महिलाच त्यांना मतपेटीतून उत्तर देतील. शिल्लक गटाची महिला बचत गटावर बोलण्याची पात्रता नाही, असेही रत्नाकर जोशी यांनी हरी खोबरेकर यांना सुनावले आहे.
