Tuesday, November 11, 2025
Google search engine
Homeसिंधुदुर्ग जिल्हाकणकवलीमहाविकास आघाडीच्या नेत्यांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवणार ; संदेश पारकर

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवणार ; संदेश पारकर

कणकवली | प्रतिनिधी 

कणकवली विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून जनतेसमोर जाणार आहे. नितेश राणे स्वतःच्या भावाला आपल्या पक्षात न्याय देवू शकले नाहीत . ते कार्यकर्त्यांचे प्रवेश घेवून काय करणार? त्यांनी आत्मपरीक्षण करावे? आपला भाऊ भाजपा सोडून का गेला? आपला पराभव दिसत असल्याने प्रवेश केलं जातं आहेत. राणे भाजप झाल्याने मूळ भाजपची वाढ खुंटली आहे.गेल्या 35 वर्षात हे राणे मंत्री झाले,मुख्यमंत्री झाले, केंद्रीय उद्योग मंत्री झाले एक तरी उद्योग आणला काय ? राणेंना सत्ता पाहिजे, आपल्या घरातच आमदार,खासदार झाले पाहिजे असल्याचा घाणाघाती आरोप महायुतीचे उमेदवार संदेश पारकर यांनी केला. 

कणकवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते , यावेळी विधानसभा अध्यक्ष सतीश सावंत , काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत,युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, आप चे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर,मज्जित बटवाले,निलम पालव सावंत , अभय शिरसाट 

संदेश पारकर म्हणाले , ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे मनापासून आभार मानतो.कणकवली विधानसभा मतदारसंघात उमेदवारी दिली,माझ्यावर विश्वास दिला,जनतेत जावून विश्वास सार्थकी ठरवणार आहे. जिल्ह्याचे माजी खा.विनायक राऊत,आ.वैभव नाईक,संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर,गौरीशंकर खोत यांचे आभार मानतो. आम्ही सांघिक काम करून विजय मिळवणार आहे. कणकवली विधानसभा मतदारसंघातून 21 हजारपेक्षा जास्त मताधिक्याने माझा विजय होईल. जिल्ह्यातील लोकांना,शिवसैनिकांना,महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना आवाहन करतो,29 ऑक्टोंबर सकाळी 10 वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार आहोत.यावेळीखा.संजय राऊत, शिवसेना नेते अनिल परब ,माजी खा. विनायक राऊत, सुषमा अंधारे यांना बोलावलं आहे. भगवती हॉल येथून तहसीलदार कार्यालय येथे जाणार आहोत. या मतदार संघात दलित,मराठा,मुस्लिम,धनगर अनेक समाज आहेत,त्यांना आरक्षण मिळाले नाही. महागाई वाढली आहे,त्यावर नियंत्रण करणेसाठी आमचा प्रयत्न असणार आहे.पर्यटन माध्यमातून आर्थिक समृद्धी येण्यासाठी काम केलं जाईल. हिंदू मुस्लिम असा द्वेष निर्माण करायचा प्रयत्न विरोधक करीत आहेत.काही नेते हिंदुत्वाचा मुद्दा घेवून फिरत आहेत.आम्ही एकसंघ आहोत,आम्ही सर्व समाज एकत्र आहोत. असेही संदेश पारकर यांनी सांगितले. 

यावेळी विधानसभा अध्यक्ष सतीश सावंत , काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत,युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, आप चे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर आदींना सांघिकपणे काम करणार असल्याचे सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!