मुंबई | वृत्तसेवा
भाजपचे प्रदेश सदस्य दत्ता सामंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व माजी खासदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत मुंबई येथे शिवसेनेत प्रवेश केला दत्ता सामंत यांच्याजवळ शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी देण्यात येणार असल्याचे समजते.
खासदार नारायण राणे यांचे कट्टर समर्थक तसेच माजी खासदार निलेश राणे यांच्यासोबत सातत्याने असणारे भाजपचे प्रदेश सदस्य दत्ता सामंत यांनी माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबई येथे दत्ता सामंत यांनी शिवसेनेत प्रवेश केला यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे रवींद्र फाटक तसेच मालवण येथील कार्यकर्ते उपस्थित होते.
