कुडाळ | प्रतिनिधी
कुडाळ मालवण विधानसभेचे महायुतीचे उमेदवार श्री. निलेश नारायण राणे उद्या सोमवार दि. २८ ऑक्टोबर रोजी सकाळी ठीक १० वा. आपला उमेदवारी अर्ज कुडाळ प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या जवळ दाखल करणार आहेत. अशी माहिती कुडाळ मंडल अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर यांनी दिली आहे.
यावेळी सिंधुदुर्ग रत्नागिरीचे खासदार नारायण राणे, पालकमंत्री श्री. रवींद्र चव्हाण, मंत्री श्री. दीपक केसरकर, आमदार श्री. नितेश राणे तसेच महायुती घटकपक्षाचे भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी, रिपाई जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी, व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. तरी महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी उपस्थित राहावे असे आवाहन कुडाळ मंडल अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर यांनी केले आहे.
