कुडाळ | प्रतिनिधी
शिवसेनेचे उमेदवार निलेश राणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी श्री देव कुडाळेश्वराचे कुटुंबीयांसोबत दर्शन घेतले. यावेळी शिवसेनेचे उमेदवार निलेश राणे व भाजपचे उमेदवार आमदार नितेश राणे हे बहुमताने निवडून यावेत असे साकडे श्री देव कुडाळेश्वर समोर घालण्यात आले.
महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार निलेश राणे यांनी आज सोमवारी (दि. २८) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे निश्चित केल्यानंतर कुडाळ शहरातील श्री देव कुडाळेश्वराचे दर्शन कुटुंबीयांसोबत घेतले यावेळी खासदार नारायण राणे, सौ. निलमताई राणे, आमदार नितेश राणे, सौ प्रियांका राणे, अभिराज राणे तसेच महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
