कुडाळ | प्रतिनिधी
कोणताही गाजावाजा न करता साध्या पद्धतीने महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांनी शिवसेना पक्षाकडून आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी ऐश्वर्या काळुसे यांच्याजवळ दाखल केला यावेळी महायुतीचे नेते, पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भाजप, शिवसेना, अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई या महायुतीच्या वतीने निलेश राणे यांनी शिवसेना पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी खासदार नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिवसेना उपनेते संजय आंग्रे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, राष्ट्रवादी काँग्रेसचे काका कुडाळकर तसेच जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी मंडळ अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, माजी आमदार प्रमोद जठार, महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, संजू परब, बबन शिंदे, जिल्हा सरचिटणीस रणजित देसाई, माजी जि. प. अध्यक्ष दीपलक्ष्मी पडते, प्रदेश सदस्य संध्या तेरसे, चिटणीस विनायक राणे, राजू राऊळ, अशोक सावंत, आनंद शिरवलकर, राजा गावकर, किसन मांजरेकर, भाजपा गटनेता विलास कुडाळकर नगरसेवक अभिषेक गावडे, निलेश परब, राजीव कुडाळकर, गणेश भोगटे, नगरसेविका प्राजक्ता बांदेकर, नयना मांजरेकर, चांदणी कांबळी, जिल्हा बँक संचालक बाबा परब, अस्मिता बांदेकर, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष दीपक नारकर, आर. के. सावंत, जिल्हा बँक संचालक प्रकाश मोर्ये, मोहन सावंत, रवी किरण तोरस्कर, सौ अदिती सावंत आदी उपस्थित होते.
अर्ज दाखल केल्यानंतर माहितीचे उमेदवार निलेश राणे यांनी सांगितले की या मातीने आम्हाला अनेक पदे दिले आहेत या मातीचे ऋण फेडण्यासाठी आम्ही सतत या मातीतील जनतेची सेवा करत राहणार आणि ही सेवा करता यावी म्हणूनच निवडणूक लढवत आहे ही निवडणूक आम्ही शांततेने घेणार आहोत आमची बांधिलकी ही जनतेशी आहे आमच्या सोबत जनता आहे त्यामुळे शक्ती प्रदर्शन करण्याची आम्हाला आवश्यकता नाही असे त्यांनी यावेळी सांगून जनता आम्हाला भरभरून आशीर्वाद देईल यात वाद नाही असे सांगितले.
