Thursday, May 7, 2026
Google search engine
Homeसिंधुदुर्ग जिल्हाकणकवलीमहायुतीचे उमेदवार नितेश राणे यांनी शक्ती प्रदर्शन करून दाखल केला उमेदवारी अर्ज

महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांनी शक्ती प्रदर्शन करून दाखल केला उमेदवारी अर्ज

कणकवली | प्रतिनिधी 

भाजप आणि महायुतीचे कणकवली विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार नितेश राणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. यावेळी हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ढोलताशांच्या गजरात येथील गांगोमंदिर ते तहसील कार्यालय अशी भव्य पायी रॅली काढण्यात आली. यानिमित्त खास सजविण्यात आलेल्या वाहनामध्ये उमेदवार नीतेश राणे यांच्यासह माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे, पालकमंत्री तथा राज्याचे बांधकाममंत्री रविंद्र चव्हाण, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, माजी खासदार तथा कुडाळ – मालवण विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार नीलेश राणे, सौ. नीलम राणे, सौ. नंदिता राणे, माजी आमदार ऍड. अजित गोगटे, माजी आमदार प्रमोद जठार, शिवसेना उपनेते संजय आग्रे, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, प्रियांका राणे, अभीराज राणे, निमीष राणे आदी उपस्थित होते. मोठ्या संख्येने दाखल झालेले भाजप, महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे अभिवादन स्विकारत रॅली पुढे सरकत होती. यावेळी भाजप, महायुती, नारायण राणे, नीतेश राणे यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. कार्यकर्त्यांच्या हातामध्ये असणारे भाजप, महायुती, नीतेश राणे यांचे समर्थन करणारे, महायुतीच्या अनेक नेत्यांचे फोटो असणारे फलक लक्षवेधी दिसत होते. विशेष म्हणजे रॅलीदरम्यान कार्यकर्त्यांचा उत्साह लक्षणीय होता.

यावेळी रॅलीमध्ये माजी जि. प. अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, विधानसभा प्रमुख मनोज रावराणे, जिल्हा सेक्रेटरी संदीप साटम, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, दिलीप तळेकर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री व, माजी जि. प. उपाध्यक्ष आरीफ बगदादी, देवगड तालुकाध्यक्ष राजू शेट्ये, अमित साटम, दया पाटील, वैभववाडी तालुकाध्यक्ष सुधीर नकाशे, प्रमोद रावराणे, दिलीप रावराणे, प्राची तावडे, उषकला केळुसकर, प्रियंका साळसकर, देवगड तालुकाध्यक्ष बंड्या नारकर, जिल्हा चिटणीस अमोल तेली, भाजप अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष नामदेव जाधव, संतोष किंजवडेकर, माजी जि. प. सदस्या सावी लोके, वंदना किंजवडेकर आदी सहभागी झाले होते

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!