Sunday, September 6, 2026
Google search engine
Homeआपलं कुडाळवैभव नाईक यांच्या अर्जावर घेतलेल्या हरकतीनंतर दोन गटात झाली बाचाबाची 

वैभव नाईक यांच्या अर्जावर घेतलेल्या हरकतीनंतर दोन गटात झाली बाचाबाची 

कुडाळ | प्रतिनिधी 

अपक्ष उमेदवार वैभव जयराम नाईक यांच्या अर्जावर घेतलेल्या हरकतीनंतर कुडाळ तहसील कार्यालय येथे दोन गटामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली यामध्ये पोलिसांनी हस्तक्षेप करून हा वाद मिटविला.

कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीमध्ये अपक्ष वैभव जयराम नाईक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. आज (बुधवारी) प्रांत कार्यालय येथे छाननी होती या छानणीमध्ये अपक्ष उमेदवार वैभव जयराम नाईक यांच्या अर्जावरील सूचकापैकी जयराम प्रदीप नाईक यांची या अर्जावरील सही त्यांनी मारलेली नाही अशी हरकत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उमेदवार वैभव नाईक यांच्या प्रतिनिधींनी घेतली त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी ऐश्वर्या काळुसे यांनी याबाबत सही मारणारे जयराम नाईक यांना प्रतिज्ञापत्र देण्यासंदर्भात सूचना केल्या होत्या. 

दरम्यान जयराम नाईक यांनी आपले प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी ते तहसिल कार्यालय येथे आल्यावर त्यांना अडवण्याचा प्रयत्न झाला आणि यामध्ये शेखर राणे यांच्यासोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे संजय पडते, राजू गवंडे, शेखर गावडे, बबन बोभाटे यांच्यामध्ये वाद झाला. यामध्ये जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली. हा वाद मिटवण्यासाठी पोलिसांसह दीपक नारकर, योगेश घाडी यांनी प्रयत्न केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!