कुडाळ | प्रतिनिधी
कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवणाऱ्या वैभव जयराम नाईक यांचा अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी यांनी अवैद्य ठरवला आहे. या अर्जावर सूचक म्हणून सही असणाऱ्या जयराम प्रदीप नाईक यांनी ही सही मी केली नसल्याचे प्रतिज्ञापत्र ग्राह्य मानून हा अर्ज अवैध ठरवण्यात आला आहे.
कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघामध्ये वैभव जयराम नाईक यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली होती त्यामुळे या निवडणुकीमध्ये वैभव नाईक या नावाचे दोन उमेदवारांचे अर्ज दाखल झाले होते. दरम्यान आज (बुधवारी) छाननी झाली या छाननी मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उमेदवार वैभव नाईक यांचे निवडणूक प्रतिनिधी अनंत पाटकर यांनी वैभव जयराम नाईक यांच्या उमेदवारी अर्जवर असलेल्या दहा सूचकांपैकी एका सूचकाची सही ही खोटी केल्याची हरकत घेतली होती जयराम प्रदीप नाईक याची सही ही नाही हे सांगितल्यावर निवडणूक निर्णय अधिकारी ऐश्वर्या काळुसे यांनी ज्या व्यक्तीची सही नाही असे म्हणत असाल तर त्या व्यक्तीचे प्रतिज्ञापत्र व त्या व्यक्तीला समोर आणण्यासाठी आदेश दिले त्यानंतर जयराम नाईक ही व्यक्ती प्रतिज्ञापत्र घेऊन निवडणूक निर्णय अधिकारी ऐश्वर्या काळुसे यांच्यासमोर आली व त्यांनी ही सही आपली नसल्याचे प्रतिज्ञापत्र देऊन याबाबत ऑन कॅमेरा आपले म्हणणे मांडले याबाबत दोन्ही बाजूने युक्तिवाद झाला दरम्यान सायंकाळी उशिरा निवडणूक निर्णय अधिकारी ऐश्वर्या काळुसे यांनी निकाल दिला यामध्ये तीन हरकती घेण्यात आल्या होत्या त्यापैकी दोन हरकती वैध ठरल्या मात्र जयराम नाईक यांची सही नाही याबाबत दिलेले प्रतिज्ञापत्र ग्राह्य म्हणून वैभव जयराम नाईक यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरविला उमेदवारी अर्ज भरताना अपक्षाला दहा सूचक असणे आवश्यक आहे या अर्जामध्ये नऊ सूचक झाल्यामुळे हा अर्ज अवैद्य ठरविण्यात आला
