मालवण | प्रतिनिधी
कट्टर राणे समर्थक आनंद भास्कर शिरवलकर यांची शिवसेनेच्या उपजिल्हाप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली असून याबाबत नियुक्तीपत्र महायुतीचे उमेदवार निलेश राणे व जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी दिले.
गेली अनेक वर्ष राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे आणि विविध पदे भूषवलेले कट्टर राणे समर्थक समजले जाणारे आनंद शिरवलकर यांना शिवसेनेचे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उपजिल्हाप्रमुख पदी नियुक्ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली असून हे नियुक्तीपत्र महायुतीचे उमेदवार निलेश राणे व जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी मालवण येथील मेळाव्यामध्ये दिले व त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
