कुडाळ | प्रतिनिधी
कुडाळ शहरातील गरजेची असलेली विकास कामे आमदार वैभव नाईक यांनी पुर्ण केल्यानेच कुडाळ शहरवासीयांचा आशिर्वाद आमदार वैभव नाईक यांना कायमचा आहे असे गौरवोद्गार कुडाळ शिवसेना शहरप्रमुख तथा नगरसेवक संतोष शिरसाट यांनी काढले.
श्री शिरसाट म्हणाले गेली कित्येक वर्षे प्रलंबित असलेला कुडाळ भंगसाळ नदी बंधारा, कुडाळ शहरातील गार्डन, भंडारी समाजाचे भुषण असलेले मच्छींद्रनाथ कांबळी नाट्यगृह,भव्य क्रिडांगण, कुडाळ बसस्थानक,महीला रुग्णालय ऐतिहासिक घोडेबाव, बॅडमिंटन सारख्या खेळाची व्यवस्था,गणेश घाट अशी शास्वत असलेली विकास कामे आमदार वैभव नाईक यांनीच केली या अगोदर ज्यांनी पंचवीस वर्षे आमदारकि भोगली त्यांना हे प्रश्न कधीही दीसले नाहीत ही खंत आहे असे सांगुन श्री शिरसाट म्हणाले या कामांमुळे आमदार वैभव नाईक यांच्यावर कुडाळ शहरवासीय या कामासाठी खुश असुन आशिर्वाद देत आहेत असेही श्री शिरसाट यांनी सांगितले
