Saturday, July 12, 2025
Google search engine
Homeसिंधुदुर्ग जिल्हाकणकवलीकणकवली शहरात पहाटेच्या सुमारास अग्नितांडव ; ऐन दिवाळीत दुकाने जळाली

कणकवली शहरात पहाटेच्या सुमारास अग्नितांडव ; ऐन दिवाळीत दुकाने जळाली

आगीत आर बी बेकरी जळून बेचिराख ; मेडिकल स्टोअर व कार्यालयाचे नुकसान

कणकवली | प्रतिनिधी

कणकवली शहरात पहाटेच्या सुमारास अग्नितांडव झाला असून शहरातील मुख्य आप्पासाहेब पटवर्धन चौकात असलेल्या आरबी बेकरीला शुक्रवारी पहाटेच्या सुमारास लागलेल्या आगीत आर बी बेकरी जळून पूर्णता बेचिराख झाली. यासोबत तेथे बाजूला असलेल्या राजू गवाणकर यांचे कार्यालय व बर्डे मेडिकलला देखील आगीचा फटका बसला. या आगीत लाखो रुपयांची हानी झाली असून ऐन दिवाळीत ही दुकाने अक्षरशा बेचिराख झाली आल्याने मोठे नुकसान झाले आहे.

घटनेची माहिती मिळतात कणकवली माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्यासह नागरिकांनी धाव घेतली. आगीचा भडका एवढा जोरात होता की या आगीत चौकातील इतर दुकाने देखील आगीच्या भक्षस्थानी पडली. कणकवली नगरपंचायतचा बंब येऊन देखील आग आटोक्यात येत नव्हती. अखेर कुडाळ एमआयडीसी व मालवण नगरपंचायत चां बांब बोलावण्यात आला. त्यानंतर आग काही प्रमाणात आटोक्यात आली. 

पावसाचा जोर काल संध्याकाळपासूनच पावसाचा जोर होता त्यातच विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत होता. पावसाच्या जोडीला विजांचा लखलखाट आणि ढगांचा गडगडाट सुरू होता. सकाळपर्यंत पाऊस सुरू होता.

भीषण आग

पहाटे चार वाजता वाजण्याच्या सुमारास ही आग लागली असावी असा अंदाज आहे. कणकवली शहरातील अप्पासाहेब पटवर्धन या मुख्य चौकात आरबी बेकरी आहे. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. रस्त्यावरून जाणाऱ्या काही जणांना ही आग दिसून आली .त्यांनी तातडीने बेकरीच्या मागे असलेल्या राजू गवाणकर, गौरव गवाणकर यांना उठवून याबाबत कल्पना दिली. त्यानंतर आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला.शॉर्टसर्किटने आग लागली असावी असा अंदाज व्यक्त होत आहे.आर बी बेकर्स दुकानातील संपूर्ण फर्निचर, बेकरी माल जळून खाक झाला. तर बेकरीच्या मागील राजू गवाणकर यांचे कार्यालय आणि कार्यालयालगत असलेल्या बर्डे यांच्या मेडिकल स्टोअर मधील साहित्याचे ही मोठे नुकसान झाले. घटनास्थळी पोलीस नगरपंचायत, महसूल प्रशासन दाखल झाले होते. नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!