कुडाळ | प्रतिनिधी
शासनाकडून शेतकऱ्यांसाठी एवढ्या चांगल्या योजना असून त्या योजना कृषी विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांकडून राबविल्या गेल्या तर या ठिकाणचा शेतकरी आर्थिक समृद्ध होईल असे आमदार निलेश राणे यांनी सांगून यापुढे शेतकऱ्यांच्या बाबतीत कोणतीही सबब ऐकून घेतली जाणार नाही शेतकऱ्यांची कामे आणि त्यांच्या योजना त्यांच्या बांधापर्यंत घेऊन जा अन्यथा कारवाईला सामोरे जा अशा कडक शब्दात कृषी अधिकाऱ्यांना आमदार निलेश राणे यांनी बजावले.
कुडाळ येथे कुडाळ व मालवण तालुक्यातील कृषी विभागाची खरीप हंगामाची आढावा बैठक आमदार निलेश राणे यांनी घेतली. यावेळी जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, माजी आमदार राजन तेली, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल, जिल्हा परिषद बांधकाम सभापती संतोष साठविलकर, सभापती मिलिंद नाईक, तहसीलदार सचिन पाटील, मालवण तहसीलदार गणेश लव्हे, जिल्हा कृषी अधीक्षक भाग्यश्री नाईक नवरे, विभागीय कृषी अधिकारी उमाकांत पाटील, अनिकेत कदम, मालवण तालुका कृषी अधिकारी श्रीपाद चव्हाण उपस्थित होते.
या आढावा बैठकीमध्ये कुडाळ व मालवण तालुक्यातील कृषी अधिकाऱ्यांनी वर्षभरामध्ये कोणत्या प्रकारे कृषी विभागाने काम केले आणि यावर्षी कृषी विभागामार्फत कोणत्या योजना शेतकऱ्यांसाठी राबविले जाणार आहेत त्याची माहिती दिली. दिलेली माहिती आणि शेतकऱ्यांनी व्यक्त केलेल्या भावना यासंदर्भात आमदार निलेश राणे यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले बजेट मध्ये या विभागाला मोठ्या प्रमाणावर झुकत माप दिलं जातं कारण शेतकरी हा कणा आहे मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हा कणा मोडून टाकण्याचे काम अधिकारी वर्ग करत असल्याचे दिसत आहेत शासनाच्या वेगवेगळ्या योजना आहेत मात्र त्या राबवताना अधिकारी कर्मचारी शेतकऱ्यांपर्यंत या योजना का घेऊन जात नाही आणि त्या चांगल्या प्रकारे का राबवत नाहीत असा सवाल उपस्थित केला एखाद्या शेतकऱ्याचे नुकसान झाले मग ते पावसाळी असो किंवा हिवाळी असो त्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शासनाने दिलेल्या सूचनेनुसार तात्काळ पंचनामे झाले पाहिजेत पंचनामे करण्यासाठी कोणाच्या आदेशाची गरज नाही कृषी विभागाने ते पंचनामे करणे प्राप्त आहेत यावर्षी काजू व आंबा बागायतदारांना अपेक्षित असलेले काम कृषी विभागाकडून झाले नाही त्यांना जाणीवपूर्वक टाळण्याचा प्रयत्न केला गेला असे त्यांनी सांगून शेतकऱ्यांची आणि या सभागृहाची दिशाभूल करू नका ते तुम्हाला महागात पडेल तुमच्यात सुधारणा करा अशा कडक भाषेत अधिकाऱ्यांना सुनावले यापुढे कोणतीही सबब ऐकून घेतली जाणार नाही अधिकाऱ्यांनी आपले काम प्रामाणिकपणे केले तर शेतकरी आर्थिक समृद्ध होऊ शकतो आता नव्याने आणलेल्या शासनाच्या योजना राबवण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत कुडाळ व मालवण मध्ये अनेक प्रगतशील शेतकरी आहेत पण ठराविक शेतकऱ्यांना पुरस्कार दिले जातात इतर शेतकऱ्यांना का डावलले जाते ठराविक शेतकरीच तुमचे लाडाचे प्रगतशील शेतकरी आहेत का असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केला. तसेच त्यांनी गेल्या वर्षभरामध्ये खर्च झालेल्या निधी संदर्भात श्वेतपत्रिका काढा अशा सूचना कृषी अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष दीपक नारकर यांनी फार्मर आयडी संदर्भात प्रश्न उपस्थित केला फार्मर आयडी शेतकऱ्यांना तात्काळ मिळत नाही हे फार्मर आयडी नसले तर योजना मिळत नाही यासंदर्भात तहसीलदार सचिन पाटील यांनी फार्मर आयडी देण्या संदर्भात तात्काळ कार्यवाही केली जाईल असे सांगितले तर जिल्हा परिषद सदस्य रुपेश कानडे यांनी गाव शिवार योजना किती गावांमध्ये राबवली गेली आणि त्याचा उपयोग किती शेतकऱ्यांसाठी झाला असा सवाल उपस्थित केल्यानंतर कुडाळ कृषी अधिकारी चौगुले हे निवृत्त झाले तसेच संकरित बियाणे शेतकऱ्यांना मोफत उपलब्ध पूर्वी करून दिले जात होते असे माजी जिल्हा परिषद सदस्य दिनेश साळगावकर यांनी सांगितले यासंदर्भात आमदार निलेश राणे यांनी सांगितले की यावर्षी जिल्हा परिषदेमार्फत शेतकऱ्यांना संकरित बियाणे वाटप करण्यासंदर्भात नियोजन केले जाईल. तसेच या आढावा बैठकीमध्ये कुडाळ व मालवण तालुक्यातील प्रगतशील शेतकऱ्यांचे सत्कार करण्यात आले.


