Saturday, November 8, 2025
Google search engine
Homeसिंधुदुर्ग जिल्हासावंतवाडीविशाल परब यांना बंडखोरी भोवली ; भाजपामधून केली हकालपट्टी

विशाल परब यांना बंडखोरी भोवली ; भाजपामधून केली हकालपट्टी

सावंतवाडी | प्रतिनिधी 

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून महायुतीच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध बंडखोरी करत अपक्ष म्हणून लढणारे राज्य भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष विशाल परब यांना अखेर ही बंडखोरी भोवली असून पक्षाने त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई केली आहे.

परब यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली असून तसे पत्र भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी परब यांना पाठवले आहे. पक्षाचा आदेश असतानाही अर्ज मागे न घेतल्याबद्दल परब यांच्याविरुद्ध ही शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली असून त्यांचे पक्षाचे असलेले प्राथमिक सदस्यत्वही रद्द करण्यात आले आहे.

काल अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस होता मात्र परब यांनी अर्ज मागे न घेता अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याचा निर्णय आपल्या समर्थकांच्या बैठकीत घेत बंडखोरी केली.या मतदारसंघातून शालेय शिक्षण मंत्री शिंदे सेनेचे दीपक केसरकर हे महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत. दरम्यान पक्षाने केलेल्या कारवाईला न जुमानता परब यांनी आज सावंतवाडी,वेंगुर्ले, दोडामार्ग इथे आपली कार्यालय उघडत प्रचाराचा नारळ फोडला.

याच मतदारसंघात महाविकास आघाडीतही बंडखोरी झाली असून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या अर्चना घारे – परब या अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. ऊबाठा सेनेचे राजन तेली हे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत. अर्चना घारे – परब यांनी आजपासून आपल्या प्रचाराला सुरुवात केली असून पक्षशिस्तभंग केल्याबद्दल त्यांच्याविरुद्ध लवकरच कारवाई होणार असल्याचे पक्षाच्या सूत्राने सांगितले.यासंदर्भात पक्षश्रेष्ठी योग्य तो आणि लवकर निर्णय घेतील असेही या सूत्रांकडून सांगण्यात आले.

     बाळा गावडे उबाठातून बाहेर..!

उबाठा सेनेचे जिल्हा समन्वयक आणि या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेले चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे.आयात केलेल्या उमेदवाराला उमेदवारी दिल्यामुळे नाराज झालेल्या गावडे यां पक्षत्याग केला आहे. गावडे यांच्या या कृतीमुळे उबाठा सेनेचे,महाविकास आघाडीचे उमेदवार राजन तेली यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!