कुडाळ | प्रतिनिधी
कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाची मतमोजणी कुडाळ तहसील कार्यालय येथे होणार असून या मतमोजणीसाठी येणाऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी जागा निश्चित करण्यात आले आहेत.
कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीची मतमोजणी उद्या शनिवार २३ नोव्हेंबर रोजी होणार असून ही मतमोजणी ऐकण्यासाठी येणाऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांसह मतदारांसाठी जागा निश्चित करण्यात आले आहे यामध्ये शिंदे गट शिवसेना पक्षासाठी संत राऊळ महाराज महाविद्यालय येथील देसाई चौक उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेसाठी चिंतामणी हॉटेल जवळ तर अपक्षांसाठी कुडाळ हायस्कूल मैदानावर जागा निश्चित करण्यात आले आहे निकाल सर्वांना ऐकता यावा म्हणून स्पिकर व्यवस्था करण्यात आली आहे.
