Saturday, November 8, 2025
Google search engine
Homeआपलं कुडाळमी जीवाचं रान करीन आणि रक्ताचे पाणी करीन ; महायुतीचे आमदार निलेश...

मी जीवाचं रान करीन आणि रक्ताचे पाणी करीन ; महायुतीचे आमदार निलेश राणे

कुडाळ | प्रतिनिधी

मी जीवाचं रान करीन आणि रक्ताचे पाणी करीन आणि या मतदार संघाची सेवा करेन तुम्ही दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असे नवनिर्वाचित महायुतीचे आमदार निलेश राणे यांनी कुडाळ भाजप कार्यालय येथे मिरवणूक समाप्तीवेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना सांगितले. ही विजयी रॅली संत राऊळ महाराज महाविद्यालय चौक ते भाजप कार्यालय पर्यंत काढण्यात आली. 

महायुतीचे उमेदवार निलेश राणे हे निवडून आल्यानंतर कार्यकर्त्यांनी संत राऊळ महाराज महाविद्यालय चौक ते भाजप कार्यालय पर्यंत विजय रॅली काढली यामध्ये जयघोष करीत डीजेच्या तालावर गुलालाची उधळण करून विजयी रॅली काढण्यात आली. भाजप कार्यालय येथे संपविण्यात आली. यावेळी महायुतीचे आमदार निलेश राणे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला ज्या पद्धतीने आपण शांततेने ही निवडणूक लढवली अशी शांतता पुढील काळात ठेवूया मतदारांनी आपल्यावर जो विश्वास दाखविला आहे त्याला तडा जाऊ देऊया नको जनसेवा मानून काम करूया जी वचने निवडणूक काळामध्ये दिली आहे ती वचने पूर्ण करण्यासाठी काम करूया या मतदारसंघातील जनतेची सेवा करण्यासाठी मी जीवाचे रान आणि रक्ताचे पाणी करीन ही जनता सुखी व्हावी समृद्ध व्हावी हे माझं उद्दिष्ट असणार आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले. 

बंधूंची झाली गळा भेट 

महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांची विजयी मिरवणूक संपल्यावर त्या ठिकाणी आमदार नितेश राणे हे आले आणि दोन्हीही बंधूंनी गळाभेट घेतली तसेच त्यांनी खासदार नारायण राणे यांचे छायाचित्र उंचावले. या गळाभेटीने विजयाचे वातावरण भावनिक झाले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!