बांगला देशात होणाऱ्या हिंदू धर्मीयांवरील अत्याचाराविरोधात काढण्यात आलेल्या न्याय यात्रेला हिंदू धर्मियांकडून उस्फुर्त प्रतिसाद

0

सिंधुदुर्ग | प्रतिनिधी 

बांगला देशामध्ये हिंदू धर्मियांवर होणाऱ्या अत्याचारा विरोधात सिंधुदुर्ग जिल्ह्यात बांगलादेश हिंदू न्याय यात्रा काढण्यात आली या यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणावर हिंदू धर्मीय सहभागी झाले होते. या संदर्भात जिल्हाधिकारी अनिल पाटील यांना हिंदू धर्मीयांनी निवेदन दिले. 

जागतिक मानवी हक्क दिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बांगलादेशमध्ये होणाऱ्या हिंदू धर्मीयांवर अत्याचारा विरोधात हिंदू न्याय यात्रा काढण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ही यात्रा जिल्हाधिकारी कार्यालया जवळ आली या ठिकाणी बांगलादेश येथे होणाऱ्या हिंदू धर्मियांवर अन्याया संदर्भात माहिती देण्यात आली यावेळी माजी मंत्री व आमदार दीपक केसरकर, आमदार नितेश राणे, आमदार निलेश राणे तसेच विविध हिंदू धर्मीय संघटना व राजकीय पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते दरम्यान यासंदर्भात जिल्हाधिकारी अनिल पाटील यांना निवेदन सादर करण्यात आले.