सिंधुदुर्गनगरी | जिमाका
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ७० ग्रामपंचायतींना राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाअंतर्गत टी.बी.मुक्त ग्रामपंचायत पुरस्कार २०२३ प्राप्त झालेला आहे. या ग्रामपंचायतींचा पुरस्कार वितरण सभारंभ जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार दि. १२ डिसेंबर २०२४ रोजी जिल्हा नियोजन समिती सभागृह (नवीन) येथे सकाळी १०.३० वाजता आयोजित करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांनी दिली आहे.
