कुडाळ | प्रतिनिधी
तालुक्यातील हिर्लोक आंबेडकरवाडी येथे जादूटोणा व अघोरी कृत्य करण्याचा प्रयत्न करणाऱ्या विशाल जाधव यांच्या ठाणे येथील घरी पोलिसांचे पथक रवाना झाले असून या अघोरी कृत्यासाठी अजून काही साहित्य किंवा वस्तू वापरले जाणार होते का तसेच यामागे अजून काही वेगळा मनसुबा यांचा होता हा शोध लावण्यासाठी कुडाळ पोलीस प्रयत्न करत आहेत.
कुडा तालुक्यातील हिर्लोक आंबेडकरवाडी येथील विशाल जाधव यांच्या घरात संशयास्पद जादूटोणा व अघोरी कृत्य करण्याचा डाव पोलिसांनी हाणून पाडला. याबाबत चौकशी पोलिसांनी केली तेव्हा विशाल जाधव व त्यांची पत्नी हर्षाली जाधव हिने आपल्याला मूल होत नसल्यामुळे गृहशांती करण्याचा आमचा प्रयत्न होता असे जरी सांगितले गेले तरी यामागे नरबळी सारखा प्रकार करण्याचा त्यांचा हेतू असल्याचा पोलिसांच्या तपासात काही गोष्टी पुढे आल्यामुळे त्या दृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला. दरम्यान या प्रकरणातील चिपळूण येथील सुस्मित गमरे याला घेऊन पोलिसांनी चिपळूण येथे त्याच्या घराची झडती घेतली मात्र त्या ठिकाणी पोलिसांना कोणत्याही प्रकारची संशयास्पद किंवा अघोरी कृत्य करण्यासंदर्भातील साहित्य वस्तू मिळालेले नाहीत. दरम्यान पोलिसांनी आपल्या तपासाची दिशा ठाण्याच्या दिशेने वळवली असून विशाल जाधव ज्या ठिकाणी राहत आहे त्या ठिकाणी अशा प्रकारचे साहित्य किंवा वस्तू सापडून येतील का तसेच यामागे नेमका त्यांचा प्लॅन काय होता? याची माहिती मिळू शकेल का? या दृष्टीने हा तपास सुरू केला आहे आतापर्यंत पोलिसांना पकडलेल्यापैकी कोणीही वेगळं असं उत्तर दिलेले नाही या सर्वांनी जाधव कुटुंबीयांना मुलं होत नसल्यामुळे वास्तुशांती करण्याचा आमचा उद्देश होता हे या वाक्यावर कायम राहिले आहेत. त्यामुळे कुडाळ पोलिसांचा तपास पुढे सरकताना दिसत नाही.
