कुडाळ | प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे मत्स्य उद्योग व बंदर मंत्री नितेश राणे यांचे कुडाळ येथे शिवसेनेच्या वतीने स्वागत करण्यात आले यावेळी त्यांच्या समवेत आमदार निलेश राणे उपस्थित होते.
महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्रिमंडळात नितेश राणे यांची निवड झाली आणि त्यांना मत्स्य उद्योग व बंदर खाते देण्यात आले ते सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते त्यांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. कुडाळ येथे आरएसएन हॉटेल समोर मत्स्योद्योग व बंदर मंत्री नितेश राणे यांचे शिवसेनेच्या वतीने स्वागत करण्यात आले यावेळी आमदार निलेश राणे, शिवसेना उपनेते संजय आंग्रे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, संजू परब, उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर, माजी नगराध्यक्ष विनायक राणे, राजा गावडे, कुडाळ तालुका प्रमुख बंटी तुळसकर, श्री. करलकर आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
