कुडाळ शहराच्या विकासासाठी सोबत काम करूया :- आमदार निलेश राणे

0

 

कुडाळ | प्रतिनिधी 

ही पहिली बैठक आहे म्हणून मी फक्त चर्चा करुन आढावा घेत आहे दुसऱ्या बैठकीत मला विकास कामांचा रिझल्ट पाहिजे केवळ येथे खुर्च्या गरम करण्यासाठी करण्यासाठी नाही तर जनतेचे सेवा, कामे करण्यासाठी कार्यरत राहा, जर तुम्ही शहराच्या विकासाच्या ॲक्शन प्लॅन करू शकला नाही तर मी तुमच्यावर ॲक्शन घेईन अशा शब्दात नवनिर्वाचित आमदार निलेश राणे यांनी कुडाळ नगरपंचायतीच्या पहिल्याच आढाव्या बैठकीत अधिकाऱ्यांना सुनावत यापुढे कुडाळ शहराच्या विकासाच्या दृष्टीने काम करा मी तुमच्यासोबत आहे असा विश्वासही त्यांनी अधिकारी कर्मचाऱ्यांना दिला.

नवनिर्वाचित आमदार निलेश राणे यांनी कुडाळ नगरपंचायत येथे आढावा बैठक घेतली यावेळी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अरविंद नातू तसेच भाजप कुडाळ तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, भाजपाचे गटनेते विलास कुडाळकर, नगरसेविका प्राजक्ता बांदेकर, संध्या तेरसे, चांदणी कांबळी, नगरसेवक निलेश परब, अभी गावडे, राजीव कुडाळकर, गणेश भोगटे तसेच इतर पदाधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी निलेश राणे यांनी या आढावा बैठकीत शहरात नगरपंचायतीच्या माध्यमातून प्रस्तावित असलेली विकास कामे, अगोदर मंजूर असलेली कामे, भविष्यात आवश्यक असलेली कामे याबाबत आढावा घेतला. नगरपंचायतीची १८ कर्तव्य आहेत. त्यानुसार काम केलं पाहिजे मात्र या १८ पैकी दहा ही कर्तव्य कुडाळ नगरपंचायत प्रशासन राबवत नसल्याचे ते त्यांनी सांगत याबाबत नाराजी व्यक्त केली. 

 घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प होणारच- निलेश राणे

कुडाळ शहरातील कचऱ्यावर प्रक्रिया करणारा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प हा कुडाळ एमआयडीसीतच होणार असून याबाबत निधी मी उपलब्ध करून देणार आहे. तसेच याकरिता लवकरच एमआयडीसी अधिकारी व संबंधितांची बैठक आयोजित करणार असल्याचे निलेश राणे यांनी सांगितले. 

 छोटी नाही तर मोठी कामे द्या.- निलेश राणे

नगरपंचायतीच्या वतीने देण्यात आलेली कामे, बजेट हे काही कोटींमध्ये असून अशा प्रकारे न देता, शहराच्या विकासाच्या दृष्टीने मोठी कामे सुचवा, मोठ्या प्रमाणात बजेट द्या, मी निधी प्रशासनाकडून आणून शहराचा विकास करू असे त्यांनी सांगितले. 

 विकासाच्या आड कोणी येऊ नये- निलेश राणे

मला इथे जनतेने निवडून दिले आहे त्यामुळे मी इथे कोणाशी मैत्री करायला आलो नाही, तर जनतेची, त्यांचा विकास करण्यासाठी मी आलो आहे. त्यामुळे शहराच्या विकासाच्या दृष्टीने सुरू असलेल्या विकास कामांमध्ये जर कोणी आडकाटी येत असेल मग तो माझ्या पक्षाचा असू दे अन्य कोणत्याही पक्षाचा असू दे त्यांना बाजूला केलं जाईल असा इशाराही राणे यांनी यावेळी दिला.

यावेळी माजी नगराध्यक्ष ओंकार तेली यांनी सांगितले की, गेली अनेक वर्ष मच्छी मार्केट इमारतीचा प्रश्न केवळ तेथील जागा जागेमुळे प्रलंबित आहे तर ही जागा पूर्ण नगरपंचायत प्रशासनाकडे मिळवून द्यावी अशी मागणी केली असता याबाबत तातडीने योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन राणे यांनी दिले. कुडाळ शहरात मोठ्या प्रमाणात नगरपंचायत तसेच इतर प्रशासनाच्या खुले क्षेत्र जमिनी आहेत. त्यावर अतिक्रमणे ही झाली आहे शासनाने अशी माहिती यावेळी उपस्थितानी दिली. या बाबत शासनाच्या कोणत्या खुले क्षेत्र जमिनीवर अनधिकृत कामे करण्यात आलेली आहे त्याची माहिती घ्या. व अश्या सर्व जमिनी मोकळ्या करा असे सांगितले. तसेच कुडाळ शहरातील रस्ते, पाणी, प्रश्न, वीज पुरवठा, गणेश घाट, स्पोर्ट क्लब या संदर्भात ही चर्चा करण्यात आली.

आरोग्य कर्मचाऱ्यांचे पगार वेळेत द्या- निलेश राणे 

या आढावा बैठकीमध्ये कुडाळ नगरपंचायतीमध्ये काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे संदर्भात विचारणा करण्यात या आरोग्य कर्मचाऱ्यांचे पगार वेळेत द्या. कारण ही काम करायला कोणी येत नाही आणि त्यांच्यामुळे शहर स्वच्छ राहत हे लक्षात ठेवा. त्या लोकांचे पगार ठेवले तर मी गप्प राहणार नाही झोपून ठेकेदार आहे त्याला समजावुन सांगा कर्मचाऱ्यांची तक्रार माझ्यापर्यंत येऊ देऊ नका असे त्यांनी सांगितले.