शक : १९४६, क्रोधी संवत्सर
अयन: उत्तरायण
ऋतू: सौर शिशिर ॠतू
मास : मार्गशीर्ष
पक्ष : कृष्ण
तिथी : त्रयोदशी २७.३३ पर्यंत
नक्षत्र: अनुराधा २२.१३
योग : शूल २२.२३ पर्यंत
करण : गरज १५.०५ पर्यंत
चंद्र राशी : वृश्चिक
रवि राशी : धनु
सूर्योदय: सकाळी ७.१२
सूर्यास्त : सायंकाळी ६.०९
राहूकाल: ९.५६ ते ११.१८
आजचे दिनविशेष
त्रयोदशी तिथी वर्ज्य
शास्त्रार्थ : _
१) शनिप्रदोष :
प्रत्येक मासातील शुक्ल आणि कृष्ण त्रयोदशीला ‘प्रदोष’ असे म्हणतात. शनिवारी येणार्या प्रदोष तिथीला ‘शनिप्रदोष’ म्हणतात. २८.१२.२०२४ आणि ११.१.२०२५ या दिवशी शनिप्रदोष आहे. संततीसुखासाठी आणि जीवनात येणार्या अडचणींच्या निवारणार्थ शनिप्रदोष हे व्रत करतात. प्रदोष या व्रताची देवता ‘शिव’ आहे. या दिवशी सायंकाळी शिवपूजन करावे, तसेच शिवकवच आणि शिवमहिम्नस्तोत्र वाचावे.
२) पूर्वाषाढा रवि २४.२५,
३) भद्रा २७.३३ नंतर
(संदर्भ : दाते पंचांग)
सौ. प्राजक्ता जोशी (ज्योतिष फलित विशारद, वास्तू विशारद, अंक ज्योतिष विशारद, रत्नशास्त्र विशारद, अष्टकवर्ग विशारद, सर्टिफाइड डाऊसर, रमल शास्त्री, हस्ताक्षर मनोविश्लेषण शास्त्र विशारद आणि हस्तसामुद्रिक प्रबोध) फोन नं. ९८२२६६७७५६
