कुडाळ | प्रतिनिधी
कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे हे उद्या गुरुवार ९ जानेवारी रोजी सकाळी ११ वा. कुडाळ पंचायत समिती येथे आढावा बैठक घेणार आहेत.
माजी खासदार निलेश राणे हे आमदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी विविध खात्यांचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. गेल्या आठवड्यामध्ये मालवण नगरपालिका व कुडाळ नगरपंचायतींचा आढावा घेतला होता. या आढावा बैठकीमध्ये विकासकामांबाबत चर्चा केली होती. त्यावेळी त्यांनी मालवण व कुडाळ पंचायत समितीचा सुद्धा अशा प्रकारे आढावा घेतला जाईल असे सांगितले होते. त्यानुसार त्यांनी उद्या गुरुवार ९ जानेवारी रोजी सकाळी ११ वा. कुडाळ पंचायत समिती येथे आढावा बैठक घेण्याचे निश्चित केले आहे.
