मालवण | प्रतिनिधी
बंदर जेटी वरील बंद लाईट याबाबत तक्रारी त्याबाबत पाहाणी केली. तसेच तेथील सुलभशौचालय बंद, दुर्गंधी याबाबत नागरिकांच्या तक्रारी जाणून घेतल्या. मच्छीमार्केट येथील सेल्फी पॉईंट ठिकाणी असलेली दुर्गंधी अस्वच्छता याचीही पाहाणी केली. तसेच मालवण नगरपरिषद कर्मचारी वसाहत येथे नवी इमारत उभारणी रखडली आहे. याबाबत पाहाणी केली व माहिती जाणून घेतली. या सर्वां बाबत प्रशासनाशी चर्चा करून योग्य त्या सूचना देणार असल्याचे आमदार निलेश राणे यांनी सांगितले.
