शक : १९४६, क्रोधी संवत्सर
अयन: उत्तरायण
ऋतू: सौर शिशिर ॠतू
मास : पौष
पक्ष : शुक्ल
तिथी : एकादशी १०.२० पर्यंत
नक्षत्र: कृत्तिका १३.४६ पर्यंत
योग : शुभ १४.३६ पर्यंत
करण : बव २१.२० पर्यंत
चंद्र राशी : वृषभ
रवि राशी : धनु
सूर्योदय: सकाळी ७.१५
सूर्यास्त : सायंकाळी ६.१७
राहूकाल: ११.२४ ते १२.४६
आजचे दिनविशेष
आज दिवस दुपारी २ नंतर चांगला आहे.
अग्निवास १३.४६ नंतर आहे.
शास्त्रार्थ :
१) पुत्रदा एकादशी : श्रावण शुक्ल पक्ष एकादशी आणि पौष शुक्ल पक्ष एकादशी या दोन्ही एकादशींना ‘पुत्रदा एकादशी’ म्हणतात. या दिवशी भगवान विष्णु आणि श्री लक्ष्मी यांची पूजा करतात. ‘पुत्रदा एकादशीच्या व्रताने दांपत्याला पुत्र संतती होते’, असे मानले जाते. या दिवशी श्री विष्णूचे नामस्मरण आणि कीर्तन करावे. या दिवशी ‘एकादशी माहात्म्य’ आणि ‘श्रीविष्णुसहस्रनाम’ यांचे वाचन करतात. १०.१.२०२५ या दिवशी पुत्रदा एकादशी आहे.
२) उत्तराषाढा रवि २६.२२, घबाड २६.२२ नंतर, घबाड १०.२० ते १३.४६ पर्यंत, भद्रा १०.२० पर्यंत, यमघंट १३.४६ नंतर, द्वादशी श्राद्ध
(संदर्भ : दाते पंचांग)
सौ. प्राजक्ता जोशी (ज्योतिष फलित विशारद, वास्तू विशारद, अंक ज्योतिष विशारद, रत्नशास्त्र विशारद, अष्टकवर्ग विशारद, सर्टिफाइड डाऊसर, रमल शास्त्री, हस्ताक्षर मनोविश्लेषण शास्त्र विशारद आणि हस्तसामुद्रिक प्रबोध)फोन नं. ९८२२६६७७५६
