शक : १९४६, क्रोधी संवत्सर
अयन: उत्तरायण
ऋतू: सौर शिशिर ॠतू
मास : पौष
पक्ष : शुक्ल
तिथी : पौर्णिमा २७.५७ पर्यंत
नक्षत्र: आर्द्रा १०.३८ पर्यंत
योग : वैधृति २८.३९ पर्यंत
करण : विष्टि १६.२७ पर्यंत
चंद्र राशी : २८.१९ नंतर कर्क
रवि राशी : धनु
सूर्योदय: सकाळी ७.१६
सूर्यास्त : सायंकाळी ६.१९
राहूकाल: ८.३९ ते १०.०२
आजचे दिनविशेष
वैधृति योग वर्ज्य आहे.
शास्त्रार्थ :
१. शाकंभरी पौर्णिमा : पौष शुक्ल अष्टमी तिथीपासून पौष पौर्णिमेपर्यंत शाकंभरीदेवीचा उत्सव साजरा केला जातो. या उत्सवाची समाप्ती पौष मासातील उदयव्यापिनी पौर्णिमेला होते; म्हणून या पौर्णिमेला ‘शाकंभरी पौर्णिमा’, असे म्हणतात. या दिवशी देवीला अनेक भाज्यांचा (शाक) नैवेद्य दाखवला जातो. १३.१.२०२५ या दिवशी शाकंभरी पौर्णिमा आहे.
२. भोगी : मकरसंक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीचा उत्सव साजरा करतात. या दिवशी तीळमिश्रित भाकरीसह उष्णतावर्धक भाज्या खातात. १३.१.२०२५ या दिवशी भोगी आहे.
३.माघस्नानारंभ : सूर्याेदयकाली असलेल्या पौष पौर्णिमेच्या दिवशी माघस्नानारंभ होतो. दोन दिवशी सूर्याेदयकाली पौर्णिमा तिथी असल्यास दुसर्या दिवशी माघस्नान आरंभ करतात. पौष पौर्णिमेला तीर्थक्षेत्री स्नान केल्याने विशेष लाभ होतो. तीर्थक्षेत्री स्नान करणे शक्य नसल्यास पवित्र नद्यांचे स्मरण करून स्नान करावे. १३.१.२०२५ या दिवशी सूर्याेदयकाली पौष पौर्णिमा तिथी आहे.
४.धनुर्मास समाप्ती : सूर्य ग्रहाचा धनु राशीत प्रवेश झाल्यावर दुसर्या दिवशी धनुर्मासाचा प्रारंभ होतो. भोगीच्या दिवशी म्हणजे मकरसंक्रांतीच्या आदल्या दिवशी धनुर्मास समाप्ती असते. १३.१.२०२५ या दिवशी धनुर्मास समाप्ती आहे.
५.कुलधर्म, अन्वाधान, भद्रा १६.२७ पर्यंत
(संदर्भ : दाते पंचांग)
सौ. प्राजक्ता जोशी (ज्योतिष फलित विशारद, वास्तू विशारद, अंक ज्योतिष विशारद, रत्नशास्त्र विशारद, अष्टकवर्ग विशारद, सर्टिफाइड डाऊसर, रमल शास्त्री, हस्ताक्षर मनोविश्लेषण शास्त्र विशारद आणि हस्तसामुद्रिक प्रबोध) फोन नं. ९८२२६६७७५६
